धाराशिव : मयत नामे-कुलभुषण प्रल्हादराव माने, वय 32 वर्षे, रा. वडगांव सि ता. जि. धाराशिव हे दि. 01.03.2024 रोजी 20.00 ते 20.30 वा. सु. धाराशिव ते तुळजापूर कडे जाणारे हायवे रोडचे बाजूला सिध्देश्वर कडे जाणारा सर्विस रोड वडगांव सि येथुन पायी जात होते. दरम्यान बुलेट क्र एमएच 25 ए.टी. 1911 चा चालक आरोपी नामे-राजाभाउ वसंत तौर रा. अंबेजवळगा ता.जि. धाराशिव यांने त्याचे ताब्यातील बुलेट ही हायगई व निष्काळजीपणे चालवून कुलभुषन माने यांना पाठीमागून धडक दिली.
या अपघातात कुलबुषण माने हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर बुलेटवर मागे बसलेल्या इसमास खाली पाडून जखमी करुन दोन्ही जखमींना औषध उपचार कामी घेवून न जाता व अपघाताची खबर न देता बुलेट जागीच सोडून पळून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अतुल सुर्यकांत पवार, वय 42 वर्षे, रा.वडगाव सि. ता. जि. धाराशिव यांनी दि.06.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304(अ) सह 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे- दिनेश युवराज पांडे, वय 53 वर्षे, व सोबत मयत नामे-आप्पासाहेब लिंबाजी नवले, वय 49 वर्षे, दोघे रा. कसगी ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि. 03.03.2024 रोजी 21.15 वा. सु.उमरगा येथुन दुकानाची वसुली करुन चौरस्ता रोडने कसगी गावाकडे मोटरसायकल क्र एमएच 25 व्ही 9893 वरुन जात होते. दरम्यान कदेर पाटीचे थेडे पुढे गुंजोटी शिवारातील आयनाळे यांचे शेताजवळील रोडवर टाटा सुमो जिप क्र के.ए. 32 एम 4333 चा चालकाने त्याचे ताब्यातील टाटा सुमो जिप ही हायगई व निष्काळजीपणे राँग साईडने चालवून दिनेश पांडे यांचे मोटरसायकलला उजव्या बाजूने धडक दिली. या अपघातात आप्पासाहेब नवले हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर दिनेश पांडे हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दिनेश पांडे यांनी दि.06.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : फिर्यादी नामे-व्यंकट बन्सी हंडीबाग, वय 54 वर्षे, रा. आनेगांव ता. केज जि. बीड व सोबत त्यांची बहिण नामे- रत्नमाला विनायक गायकवाड, वय 55 वर्षे, रा. सुकळी ता. केज जि. बीड हे दोघे दि. 20.02.2024 रोजी 17.00 वा. सु. आवाडशिरपुरा गावाचे नविन वस्तीचे जवळील हॉटेल आराध्य चे समोरील रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 44 एबी 3121 वरुन जात होते. दरम्यान ट्रॅक्टर हेड क्र एमएच 45 एडी 6971 चा चालकाने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हेड हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून व्यंकट हंडीबाग यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात रत्नमाला गायकवाड या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. तर व्यंकट हंडीबाग हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- व्यंकट हंडीबाग यांनी दि.06.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.