धाराशिव: करजखेडा शिवारात १० फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास झालेल्या मारामारीत परमेश्वर सुखदेव आदटराव (वय ३५) नावाचा व्यक्ती जखमी झाला आहे. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परमेश्वर आदटराव हे त्यांच्या शेतगट नंबर ३९० मध्ये असताना आरोपी पंडु नामदेव आदटराव, खंडु नामदेव आदटराव, श्रीमंत महादेव लोखंडे, रुक्मीणी नामदेव आदटराव, अंजना पवार (सर्व रा. करजखेडा), गोपाळ कोळी (रा. माळुंब्रा) आणि इतर दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना शिवीगाळ केली व लाथाबुक्यांनी तसेच लोखंडी कत्तीने मारहाण केली. यात परमेश्वर आदटराव जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती परमेश्वर आदटराव यांनी ११ फेब्रुवारी २०२५ रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ११८ (१), ११५ (२), १८९ (२), १९१ (२), १९१ (३) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बेंबळी पोलीस करत आहेत.
नांदुर्गा येथे शेतकऱ्याला मारहाण, आरोपी विरोधात गुन्हा दाखल
नांदुर्गा : येथील बेंबळी पोलीस ठाण्यात एका शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनिल लक्ष्मण बोरगावे (रा. नांदुर्गा) यांनी संजय बाबु गाढवे (वय ४५, रा. नांदुर्गा) यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण केली. गाढवे यांच्या तक्रारीवरून बोरगावे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 117(2), 115(2), 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय गाढवे हे सुसलादे यांच्या शेतातील बांधावरुन म्हशी घेऊन जात होते. त्यावेळी आरोपी सुनिल बोरगावे यांनी त्यांना शिवीगाळ केली आणि मारहाण केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या मारहाणीत गाढवे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
कळंबमध्ये मारामारी, आरोपी विरोधात गुन्हा दाखल
कळंब – कळंब शहरातील सम्राट बिअर बार समोर एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. आकाश भागवत चोंदे (रा. दत्तनगर कळंब) यांनी संतोष अच्युतराव लांडगे (वय 49, रा. चोंदे गल्ली, कळंब) यांना 11 फेब्रुवारी रोजी रात्री 12.15 वाजता शिवीगाळ करत मारहाण केली. चोंदे यांनी लांडगे यांना लाथा-बुक्क्यांनी आणि बिअरच्या बाटलीने मारहाण करून जखमी केले. तसेच, जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी संतोष लांडगे यांनी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आकाश चोंदे यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 118(1), 115(2), 352, 351(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.