कळंब – येथील परळी रोडवरील ओम साई सुपर शॉपी या किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून चोरी केली. दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9.30 ते 11 फेब्रुवारी 2025 सकाळी 8.40 च्या दरम्यान ही घटना घडली.
याबाबत दुकान मालक रमेश चांगदेव बसाटे (वय 49, रा. साई नगरी, परळी रोड, कळंब) यांनी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि सुमारे 68 हजार 200 रुपयांचे किराणा सामान चोरून नेले.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कळंब पोलीस ठाण्याचे कर्मचारी तपास करत असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.
घरातून 73,000 रुपयांची चोरी
धाराशिव: येथील धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरातून अज्ञात व्यक्तीने 73,000 रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे.
महेश गोवर्धन भोईटे (वय 31 वर्षे) रा. सकनेवाडी ता. जि. धाराशिव यांच्या राहत्या घराच्या किचनचा पाठीमागील दरवाजा उघडा राहिल्याने अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. 2 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 10.30 ते 3 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 4.00 च्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेली रक्कम चोरून नेली.
या घटनेची माहिती महेश भोईटे यांनी 11 फेब्रुवारी 2025 रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. भोईटे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलम 380 (चोरी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.