लोहारा : नागूर येथील शेतगट नंबर ७६/२ मध्ये हरभऱ्याच्या गंजीला आग लागून सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना १० फेब्रुवारीच्या सायंकाळपासून ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंतच्या वेळेत घडली.
उत्तम यादव पाटील (वय ४५) यांच्या तीन एकर शेतातील काढणी करून ठेवलेल्या हरभऱ्याच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावली. यामुळे पाटील यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाटील यांनी लोहारा पोलीस ठाण्यात मनोज माणिक लोभे (रा. नागूर) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.