• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, November 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शहरात गुटख्याचा सुळसुळाट; पोलिसांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह

admin by admin
October 8, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात गुटख्याचा सुळसुळाट; पोलिसांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदीचा कायदा लागू असूनही, जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या धाराशिव शहरात या कायद्याची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील अनेक प्रमुख भागांमध्ये प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असून, पोलीस प्रशासन याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांमधून होत आहे.

शहरातील आगड गल्ली, सांजा रोड, खाजा नगर, विजय चौक, वैराग नाका, ज्ञानेश्वर मंदिर परिसर, गालिब नगर, बस स्टँड परिसर, नगरपरिषद कॉम्प्लेक्स, आणि समर्थ नगर यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी गुटख्याची विक्री राजरोसपणे सुरू आहे. या भागांमध्ये छोटे-मोठे विक्रेते कोणाचीही भीती न बाळगता हा अवैध व्यवसाय चालवत आहेत. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार धाराशिव शहर आणि आनंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच घडत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांच्या ‘आशीर्वादानेच’ हा व्यवसाय फोफावत आहे. पोलीस यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने गुटखा माफियांना एक प्रकारे अभय मिळाल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणीच कायद्याची अशी पायमल्ली होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

तरुण पिढीला व्यसनाधीन बनवणारा हा अवैध धंदा तात्काळ बंद करावा आणि यामागे असणाऱ्यांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Previous Post

तुळजापूरमध्ये बनावट खत निर्मितीचा पर्दाफाश; ‘तेरणा व्हॅली फर्टिलायझर’चा परवाना ६ महिन्यांसाठी निलंबित

Next Post

धारशिवमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! एका भाषणाने ठिणगी पडली, आमदारांच्या एका फोनने वाद विझला!

Next Post
धारशिवमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! एका भाषणाने ठिणगी पडली, आमदारांच्या एका फोनने वाद विझला!

धारशिवमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! एका भाषणाने ठिणगी पडली, आमदारांच्या एका फोनने वाद विझला!

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरग्यात विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

November 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

नंदगाव शिवारात २४ एकर सोयाबीनच्या बनीमला आग; शेतकऱ्याचे ११ लाखांचे नुकसान

November 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंड्यात ४२ कामगारांना डांबून ठेवून १६ ते १७ तास काम; मारहाण, धमकी देत मोबदला न दिल्याचा आरोप

November 1, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात गुटखाविरोधात पोलिसांची कारवाई; कळंब, ढोकी, मुरुममध्ये ५० हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

November 1, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

नळदुर्गमध्ये गोवंशीय मांसाची वाहतूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 31, 2026

Recent Posts

  • उमरग्यात विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
  • नंदगाव शिवारात २४ एकर सोयाबीनच्या बनीमला आग; शेतकऱ्याचे ११ लाखांचे नुकसान
  • परंड्यात ४२ कामगारांना डांबून ठेवून १६ ते १७ तास काम; मारहाण, धमकी देत मोबदला न दिल्याचा आरोप
  • धाराशिव जिल्ह्यात गुटखाविरोधात पोलिसांची कारवाई; कळंब, ढोकी, मुरुममध्ये ५० हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
  • नळदुर्गमध्ये गोवंशीय मांसाची वाहतूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!