• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वालवडमध्ये दोन सराफा दुकाने फोडली; ९८ हजारांचे चांदीचे दागिने लंपास

admin by admin
November 27, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम: भूम तालुक्यातील वालवड येथे चोरांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री दोन सराफा दुकाने फोडल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश करत सुमारे ९८ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान घडली.

याप्रकरणी तानाजी आनंतराव वेदपाठक (वय ४३, रा. बावी, ता. भूम) यांनी फिर्याद दिली आहे. वालवड येथील आठवडी बाजार आणि वाल्मीकेश्वर मंदिर रोडवर फिर्यादी वेदपाठक यांचे ‘ओम ज्वेलर्स’ आणि त्यांच्या शेजारीच आप्पासाहेब यशवंत चव्हाण यांचे ‘न्यु प्रेम ज्वेलर्स’ ही दुकाने आहेत. अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही दुकानांचे कुलूप तोडून व शटर उचकटून आत प्रवेश केला.

दुकानातील १,९६० ग्रॅम वजनाचे विविध चांदीचे दागिने (किंमत अंदाजे ९८,००० रुपये) चोरट्यांनी लंपास केले. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 येडशीच्या रामलिंग मंदिर परिसरातून दुचाकी चोरीला

येडशी येथील प्रसिद्ध रामलिंग मंदिर परिसरातील कमानीसमोरून पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेली. ही घटना २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ५ वाजेच्या दरम्यान घडली.

विजय भागवत नलावडे (वय ३७, रा. येडशी) यांनी याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नलावडे यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (क्रमांक एमएच २५ एए ०१०३) मंदिर परिसरात उभी केली होती. अज्ञात चोरट्याने संधी साधत ३० हजार रुपये किमतीची ही दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


 परंडा तालुक्यातील रोसा शिवारात शेतमजुराची चोरी; ४० हजारांचा ऐवज लंपास

परंडा तालुक्यातील रोसा शिवारातील एका शेतातील झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीचे पैसे आणि मोबाईल असा ४० हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका ओळखीच्या व्यक्तीसह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शैलेश आनंदराव बेले (वय ३९, रा. जवळी, ता. पुसद, जि. यवतमाळ, सध्या रा. रोसा) यांनी परंडा पोलिसांत फिर्याद दिली आहे. शैलेश हे रोसा शिवारातील सचिन जगताप यांच्या शेतातील झोपडीत राहत होते. २६ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास आरोपी विजय सल्ले (रा. भोत्रा, ता. परंडा) आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर तीन अनोळखी व्यक्तींनी झोपडीतून रोख ३५ हजार रुपये आणि एक मोबाईल फोन चोरून नेला. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५(ए), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

तामलवाडीत ‘पिंक पथका’ची धडक कारवाई; २ लाख ६१ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव ब्रेकिंग: नगरपरिषदेच्या ३ प्रभागांतील निवडणूक स्थगित; आयोगाच्या निर्णयाने मोठा गोंधळ, नगराध्यक्षपदाचा निकालही लांबणीवर?

Next Post
धाराशिव ब्रेकिंग: नगरपरिषदेच्या ३ प्रभागांतील निवडणूक स्थगित; आयोगाच्या निर्णयाने मोठा गोंधळ, नगराध्यक्षपदाचा निकालही लांबणीवर?

धाराशिव ब्रेकिंग: नगरपरिषदेच्या ३ प्रभागांतील निवडणूक स्थगित; आयोगाच्या निर्णयाने मोठा गोंधळ, नगराध्यक्षपदाचा निकालही लांबणीवर?

ताज्या बातम्या

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

September 17, 2026
‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ

September 17, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त

September 17, 2026

Recent Posts

  • ‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!
  • ‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!
  • उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
  • तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ
  • पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!