• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब तालुक्यातील तरुणाची आत्महत्या; पैशाच्या तगाद्याला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, एकावर गुन्हा दाखल

admin by admin
July 20, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब –  उसतोडणीच्या ट्रॅक्टर मालकाकडून होत असलेल्या सततच्या पैशाच्या मागणी आणि धमकीच्या त्रासाला कंटाळून खामसवाडी (ता. कळंब) येथील एका २५ वर्षीय तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संतोष दिगंबर सौदागर असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना ३ जुलै रोजी घडली असली तरी, तब्बल १६ दिवसांनंतर मयताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एका व्यक्तीविरुद्ध शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत संतोष सौदागर हा खामसवाडी येथील ज्ञानेश्वर तुकाराम बंडगर याच्या उसाच्या ट्रॅक्टरवर कामाला होता. आरोपी बंडगर याला संतोषच्या वडिलांकडून ४०,००० रुपये येणे होते. या पैशांसाठी बंडगर हा संतोषकडे वारंवार तगादा लावून त्याला धमकावत होता.

या सततच्या त्रासाला कंटाळून संतोषने दि. ३ जुलै २०२५ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खामसवाडी शिवारातील एका शेतात विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले.

याप्रकरणी मयताची आई, वंदना दिगंबर सौदागर (वय ३५), यांनी दि. १९ जुलै २०२५ रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर तुकाराम बंडगर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि कलम ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिव: वर्ग २ मिळकतींच्या नियमितीकरणाचा मार्ग सुकर

Next Post

लोहारा: किरकोळ वादातून बारमध्ये एकाला बेदम मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

लोहारा: किरकोळ वादातून बारमध्ये एकाला बेदम मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026
भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

September 19, 2026
तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

September 19, 2026
ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत

ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत

September 19, 2026

Recent Posts

  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
  • भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले
  • तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!
  • ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!