नळदुर्ग: काटगाव येथे मोबाईलमधील स्टेटसच्या कारणावरून झालेल्या वादातून आठ जणांनी एका महिलेसह तिच्या भावाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सैदाबी बाबु पटेल (वय ६०, रा. काटगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास शिवराज नवलिंग खोबरे, चेतन पवार, अनिकेत अप्पाराव कळके, शुशांत शिवशंकर पाटील, समर्थ खुडु पावले, विराज गज्जु कळके, अभिनंदन अशोक रोकडे, गौरीशंकर चंद्रकांत कोनाळे (सर्व रा. काटगाव) यांनी त्यांना व त्यांचे भाऊ बबलु घाटवाले यांना मोबाईलमधील स्टेटसच्या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच, त्यांच्या घरावर दगडफेक करून जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी भादंवि कलम १२५, १८९(२), १९१(२), १९०, ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
काटगाव बसस्थानकावर तरुणाला मारहाण
नळदुर्ग: काटगाव येथील बसस्थानकावर एका तरुणाला मोबाईलवर कमेंट केल्याच्या कारणावरुन पाच जणांनी मारहाण करून धमक्या दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयपाल राधेश्याम मिश्रा (वय २४, रा. काटगाव) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. इरफान पठाण, अश्पाक पठाण, साहिल मुजावर, इम्रान मुजावर आणि असलम मुजावर (सर्व रा. काटगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काटगाव बसस्थानकावर ही घटना घडली. जयपाल मिश्रा यांनी मोबाईलवर केलेल्या कमेंटमुळे संतप्त झालेल्या आरोपींनी गैरकायदेशीरपणे मंडळी जमवून मिश्रा यांना शिवीगाळ केली आणि मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर जयपाल मिश्रा यांनी दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम १८९(२), १९१(२), १९०, ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.