ढोकी – इर्ला येथे मागील भांडणाचे कारणावरून एका महिलेसह तिच्या तीन मुलांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविता मोहन कांबळे (रा. इर्ला) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास इर्ला येथे निखिल कांबळे, महादेव जाधव, आदित्य कांबळे, वैभव कांबळे, अनिकेत जाधव, विलास कांबळे, कोमल कांबळे, वैष्णवी कांबळे, साखरबाई कांबळे, गंगाबाई कापरे, आर्यन कापरे, सम्राट कांबळे, रामराजे कांबळे, खंडू कापरे, अभिजीत कांबळे (सर्व रा. इर्ला) यांनी मागील भांडणाचे कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. यावेळी आरोपींनी त्यांचे हातपाय तोडण्याची धमकी दिली.
याप्रकरणी सविता कांबळे यांनी दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), १८९(२), १९१(२), १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.