मुंबई : महाराष्ट्र शासनाने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. एकूण सात अधिकाऱ्यांची पदे बदलण्यात आली असून, यात आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बदल्यांमध्ये धाराशिवच्या नवीन जिल्हाधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रमुख बदल्या :
- राजेंद्र निंबाळकर (IAS:SCS:2007) – व्यवस्थापकीय संचालक, SARATHI, पुणे (यापूर्वी व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC, मुंबई).
- संजय यादव (IAS:SCS:2009) – राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षण अभियान, मुंबई (यापूर्वी जिल्हाधिकारी, मुंबई शहर).
- डॉ. राजेंद्र भरुड (IAS:RR:2013) – प्रकल्प संचालक, RUSA, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई (यापूर्वी आयुक्त, TRTI, पुणे).
- दीपक कुमार मीणा (IAS:RR:2013) – सहआयुक्त, राज्य कर विभाग, मुंबई (यापूर्वी अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे).
- समीर कूर्टकोटी (IAS:SCS:2013) – आयुक्त, TRTI, पुणे.
- महेश आव्हाड (IAS:SCS:2015) – मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेडिकल गुड्स प्रोक्योरमेंट अथॉरिटी, मुंबई (यापूर्वी व्यवस्थापकीय संचालक, Haffkine Bio-Pharma Corporation, मुंबई).
- कीर्ती किरण पूजार (IAS:RR:2018) – धाराशिवचे नवीन जिल्हाधिकारी (यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी).
धाराशिवच्या जिल्हाधिकारीपदी ‘कीर्ती’चा नवा अध्याय!
धाराशिव जिल्ह्यातील वादग्रस्त जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या बदलीनंतर, ‘कोण होणार नवा कर्ता-धर्ता?’ या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. धाराशिवच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी आता कीर्ती किरण पूजार (IAS:RR:2018) या सोजवळ आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे.
‘कर्नाटकी’ पूजार धाराशिवकरांसाठी किती प्रभावी ठरतील?
➡ कर्नाटकच्या भूमीत जन्मलेल्या पूजार यांनी महाराष्ट्रात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
➡ त्यांचे आतापर्यंतचे प्रशासकीय प्रवास गोंडपिंपरी (चंद्रपूर) येथे उपविभागीय अधिकारी, किनवट (नांदेड) येथे आदिवासी प्रकल्प अधिकारी, आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असा राहिला आहे.
➡ प्रथमच जिल्हाधिकारीपदी विराजमान होत असल्याने ही जबाबदारी त्यांच्यासाठी मोठ्या संधीसह तितकाच मोठा कसोटीचा क्षण ठरणार आहे.