धाराशिव जिल्ह्यातील वादग्रस्त जिल्हाधिकारी म्हणून चर्चेत असलेल्या डॉ. सचिन ओंबासे यांची अखेर बदली झाली आणि १९ फेब्रुवारी रोजी त्यांनी सोलापूर महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या जागी कोण येणार, याबाबत चर्चांना उधाण आले होते. अखेर या पदावर कीर्ती किरण पूजार (IAS:RR:2018) यांची वर्णी लागली आहे.
धाराशिवच्या जिल्हाधिकारीपदी ‘कीर्ती’चा नवा अध्याय!
धाराशिव जिल्ह्यातील वादग्रस्त जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या बदलीनंतर, ‘कोण होणार नवा कर्ता-धर्ता?’ या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. धाराशिवच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी आता कीर्ती किरण पूजार (IAS:RR:2018) या सोजवळ आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे.
‘कर्नाटकी’ पूजार धाराशिवकरांसाठी किती प्रभावी ठरतील?
➡ कर्नाटकच्या भूमीत जन्मलेल्या पूजार यांनी महाराष्ट्रात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
➡ त्यांचे आतापर्यंतचे प्रशासकीय प्रवास गोंडपिंपरी (चंद्रपूर) येथे उपविभागीय अधिकारी, किनवट (नांदेड) येथे आदिवासी प्रकल्प अधिकारी, आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असा राहिला आहे.
➡ प्रथमच जिल्हाधिकारीपदी विराजमान होत असल्याने ही जबाबदारी त्यांच्यासाठी मोठ्या संधीसह तितकाच मोठा कसोटीचा क्षण ठरणार आहे.
आव्हाने
➡ भ्रष्टाचाराचा बिमोड: जिल्हाधिकारी कार्यालयात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला चाप लावणे ही पहिलीच परीक्षा असणार!
➡ तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा: तब्बल २ हजार कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळवून प्रत्यक्ष काम सुरू करणे, ही मोठी जबाबदारी असेल.
➡ मंदिरातील गैरव्यवहार रोखणे: तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचाराचे आरोप वेळोवेळी समोर येतात. नव्या जिल्हाधिकाऱ्यांना ही ‘शुद्धीकरणाची मोहीम’ हाती घ्यावी लागणार!
धाराशिवकरांच्या अपेक्षा वाढल्या!
कीर्ती पूजार यांच्या अनुभवाचा जिल्ह्यासाठी किती उपयोग होतो आणि त्या ‘कीर्ती’ स्थापन करतात की आव्हानांमध्ये अडकून पडतात, हे येणारा काळच सांगेल! 🚀