• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, October 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भातागळीत १० हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकावर लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
May 20, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

लोहारा : लोहारा तालुक्यातील भातागळी येथे राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदा विक्री करण्यासाठी बाळगल्याप्रकरणी लोहारा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १० हजार ८०० रुपयांचा गुटखा व पान मसाला जप्त केला असून, एकाविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन शंकर वाले (वय ४६, रा. भातागळी, ता. लोहारा, जि. धाराशिव) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. १९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास भातागळी येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी सचिन वाले याने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, केसरयुक्त विमल पान मसाला आणि तंबाखूचे पुडे विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लोहारा पोलिसांच्या पथकाने छापा टाकून झडती घेतली असता, त्याच्याकडे १० हजार ८०० रुपये किमतीचा प्रतिबंधित माल आढळून आला.

पोलिसांनी तात्काळ हा सर्व बेकायदेशीर मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांच्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम ५९ अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास लोहारा पोलीस करत आहेत.

Previous Post

जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना: सौरऊर्जा कंपनीच्या साहित्यासह दुचाकी लंपास; साडेतीन लाखांचा ऐवज चोरीला

Next Post

सामाईक बांधावरील गवत जाळताना आगीचा भडका; केळीच्या बागेसह अकरा लाखांचे नुकसान, एकावर गुन्हा

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

सामाईक बांधावरील गवत जाळताना आगीचा भडका; केळीच्या बागेसह अकरा लाखांचे नुकसान, एकावर गुन्हा

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीच्या दोन घटना; दोन महिला ताब्यात

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात दोन विवाहित पुरुषांचे अपहरण; लोहारा आणि परंडा पोलिसांत गुन्हे दाखल

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशी : टेम्पोतील कोऱ्या चेकवर खोटी सही करून लावला ८ लाखांचा चुना

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूर : बेकायदेशीर ताडीत (शिंदी) गुंगीचे औषध मिसळल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

October 16, 2026

Recent Posts

  • तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीच्या दोन घटना; दोन महिला ताब्यात
  • धाराशिव जिल्ह्यात दोन विवाहित पुरुषांचे अपहरण; लोहारा आणि परंडा पोलिसांत गुन्हे दाखल
  • वाशी : टेम्पोतील कोऱ्या चेकवर खोटी सही करून लावला ८ लाखांचा चुना
  • अणदूर : बेकायदेशीर ताडीत (शिंदी) गुंगीचे औषध मिसळल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!