अणदूर: मुंबई-हैदराबाद महामार्गावरील घोडके प्लॉटिंग, अणदूर येथे रविवारी दुपारी एका मोटरसायकलचा गतिरोधकावरून जाताना अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४.३६ वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग ते सोलापूर रस्त्यावर घोडके प्लॉटिंग, अणदूर येथे गतिरोधकाजवळून जाताना मोटरसायकल चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटरसायकल स्लिप झाली आणि अपघात झाला. या अपघातात संदीप चंद्रकांत ओंकार (वय ३५ वर्षे, रा. सोलापूर) आणि रफिक अब्बास तांबोळी (वय ४२ वर्षे, रा. सोलापूर) हे दोघे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच नळदुर्ग पॉईंट येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग येथे दाखल करण्यात आले आहे.