नळदुर्ग: नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात २१ वर्षीय तरुणीवर गेल्या अडीच वर्षांपासून लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावातीलच एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार केले. त्यानंतर त्याने आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी तरुणीला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने १० जानेवारी २०२५ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भा.न्या.सं. कलम- ६४(१),६४(२),(एम),६९,३५२,३५१(२)(३), ४९, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब: कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ३० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. ८ जानेवारी २०२५ रोजी दुपारी २ वाजता पीडित महिला घरी एकटी असताना गावातील एका तरुणाने तिच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केले. यावेळी त्याने महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून तिला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने या तरुणाविरुद्ध कोर्टात केस दाखल केली होती आणि तो त्या प्रकरणात तिच्यासारखी साक्ष देण्यासाठी दबाव आणत होता. महिलेने साक्ष देण्यास नकार दिल्याने त्याने हा अत्याचार केला. याप्रकरणी पीडित महिलेने १० जानेवारी २०२५ रोजी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भा.न्या.सं. कलम- ६४(अ),६४,३३३, ११५(२),३५२,३५१(२) सह अ.जा.ज.अ.प्र.का. ३(१)(आर),३(१)(एस), ३(१)(डब्लृय्फ)(i), ३(१) डब्ल्यु (ii), ३(२)(व्ही अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.