• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजाभवानी म्हणजेच ‘भारत माता’? मंदिर प्रशासनाच्या पत्रामुळे नव्या वादाची ठिणगी

admin by admin
June 15, 2025
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजाभवानी म्हणजेच ‘भारत माता’? मंदिर प्रशासनाच्या पत्रामुळे नव्या वादाची ठिणगी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: श्री तुळजाभवानी देवीच्या 108 फुटी भव्य मूर्ती उभारणीवरून सुरू असलेला वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. मंदिर संस्थानाने पुजारी मंडळाला पाठवलेल्या एका पत्रात तुळजाभवानी देवीचा उल्लेख ‘भारताची भारत माता’ असा केल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वादग्रस्त उल्लेखावरून आता प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र शासनाने श्री तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकासासाठी 1865 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. या आराखड्यानुसार, रामदरा तलाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार प्रदान करणाऱ्या श्री तुळजाभवानी आईचे 108 फुटी शिल्प उभारले जाणार आहे.  या शिल्पाच्या स्वरूपाबद्दल धर्मशास्त्र आणि परंपरेनुसार मत देण्यासाठी, मंदिर प्रशासनाने 14 जून 2025 रोजी तुळजाभवानी पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांना एक पत्र पाठवले आहे.

या पत्राची सुरुवातच “श्री तुळजाभवानी माता, भारताची भारतमाता व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे,” या वाक्याने करण्यात आली आहे. या शिल्पाच्या मूर्तीचे स्वरूप भारत मातेसारखे असल्याचा आक्षेप यापूर्वीच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह काही पुजारी आणि भाविकांनी घेतला होता. हा वाद शमलेला नसताना, आता थेट प्रशासनानेच देवीचा उल्लेख ‘भारत माता’ असा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मंदिर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे  यांच्या सहीने हे पत्र काढण्यात आले आहे. मात्र, या वादग्रस्त उल्लेखाबाबत जिल्हाधिकारी किंवा मंदिर तहसीलदारांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, देवीला ‘भारत माता’ संबोधण्याचा निर्णय नक्की कोणाच्या सांगण्यावरून घेण्यात आला, असा प्रश्न विचारला जात आहे. मूर्तीच्या स्वरूपावरून सुरू असलेल्या वादात या पत्रामुळे अधिकच भर पडली असून, येत्या काळात हा वाद आणखी पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

 

Previous Post

आवाड शिरपुरा रस्ताप्रकरणी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा; प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थी आणि नागरिक त्रस्त

Next Post

जागजी येथे आर्थिक व्यवहारातून मारहाण; एकावर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

जागजी येथे आर्थिक व्यवहारातून मारहाण; एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!