• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा दणका: ‘भारत माता’ उल्लेखाचे वादग्रस्त पत्र अखेर मागे

 मंदिर प्रशासनाकडून सुधारित पत्र जारी

admin by admin
June 16, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजाभवानी म्हणजेच ‘भारत माता’? मंदिर प्रशासनाच्या पत्रामुळे नव्या वादाची ठिणगी
0
SHARES
271
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: श्री तुळजाभवानी देवीचा उल्लेख ‘भारताची भारत माता’ असे करणारे वादग्रस्त पत्र अखेर श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने मागे घेतले आहे. ‘धाराशिव लाइव्ह’ने या पत्रासंदर्भात बातमी प्रसिद्ध केल्यानंतर आणि पुजारी मंडळाने तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, आता एक सुधारित पत्र जारी करण्यात आले आहे.

काय होते प्रकरण?

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाने 14 जून 2025 रोजी श्री तुळजाभवानी पाळीकर पुजारी मंडळाला एक पत्र पाठवले होते. नियोजित विकास आराखड्यात रामदरा तलाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देणाऱ्या आई तुळजाभवानीचे 108 फुटी शिल्प उभारले जाणार आहे. या शिल्पाच्या स्वरूपाविषयी मत मागवण्यासाठी हे पत्र पाठवण्यात आले होते. मात्र, या पत्रात प्रशासनाने श्री तुळजाभवानी माता, भारताची भारतमाता व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे,” असा उल्लेख केला होता.

या उल्लेखावरून मोठा वाद निर्माण झाला होता. आधीच मूर्तीच्या स्वरूपावरून मतभेद असताना, प्रशासनानेच देवीला ‘भारत माता’ संबोधल्याने पुजारी मंडळ आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

आक्षेपानंतर प्रशासनाची माघार

‘धाराशिव लाइव्ह’ने या वृत्ताला प्रसिद्धी दिल्यानंतर आणि पुजारी मंडळाने या उल्लेखावर अधिकृतपणे आक्षेप घेतल्यानंतर, मंदिर प्रशासनाने तातडीने दखल घेतली. तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे यांच्या स्वाक्षरीने निघालेले ते वादग्रस्त पत्र मागे घेण्यात आले. प्रशासनाने आपली चूक मान्य करत पुजारी मंडळाला एक नवीन, सुधारित पत्र पाठवले आहे. या नव्या पत्रातून वादग्रस्त उल्लेख वगळण्यात आल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे सध्या निर्माण झालेल्या वादावर पडदा पडला आहे.

 

Previous Post

कळंबमध्ये दिवसाढवळ्या वृद्धेची लूट; दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ९० हजार रुपये पळवले

Next Post

धाराशिवमधील विकासकामे सत्ताधारी पक्षांच्या कुरघोडीमुळे रखडली; काँग्रेसचा आरोप

Next Post
धाराशिवमधील विकासकामे सत्ताधारी पक्षांच्या कुरघोडीमुळे रखडली; काँग्रेसचा आरोप

धाराशिवमधील विकासकामे सत्ताधारी पक्षांच्या कुरघोडीमुळे रखडली; काँग्रेसचा आरोप

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात ‘उपोषणाचा अर्ज’ दिल्याच्या रागातून घरावार जीवघेणा हल्ला!

July 11, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब तालुक्यात सावकारी त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या! हावरगाव शिवारात लिंबाच्या झाडाला घेतला गळफास; कोल्हे दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 11, 2026
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

हरवलेल्या विवाहित महिलेला शोधून न्यायालयात हजर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

July 10, 2026
‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

July 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group