धाराशिव: धाराशिव येथील एमआयडीसीतील महिंद्रा शोरूमच्या पाठीमागील ऑइल रूममधून अज्ञात चोरट्यांनी १.२२ लाख रुपये किमतीचे ४० ऑइल बकेट चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष नगर, बार्शी येथील रहिवासी कौशिक अनिल बंडेवार (४१) यांनी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. बंडेवार हे धाराशिव एमआयडीसीतील प्लॉट नंबर बी ७२ येथील महिंद्रा शोरूममध्ये काम करतात. २८ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० ते ३१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ६.०० या वेळेत अज्ञात चोरट्यांनी शोरूमच्या मागील बाजूला असलेल्या ऑइल रूमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेथून त्यांनी ४० ऑइल बकेट चोरून नेले. या बकेटची एकूण किंमत १,२२,००० रुपये आहे.
बंडेवार यांनी २९ जानेवारी २०२५ रोजी या घटनेची तक्रार आनंदनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३८१ (४), ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चोरट्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी शोरूम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.