• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अमित शहा यांची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली भेट

धाराशिवच्या विकासासाठी रेल्वे, केंद्रीय विद्यालय, सिंचन प्रकल्पासह विविध मागण्या

admin by admin
August 4, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
अमित शहा यांची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली भेट
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नवी दिल्ली |  धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट घेऊन मतदारसंघाशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी धाराशिवच्या विकासाला गती देण्यासाठी रेल्वे, शिक्षण, सिंचन, वीज, उद्योग आणि शेतकरी हिताच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या त्यांनी गृहमंत्र्यांसमोर मांडल्या.

खासदार निंबाळकर यांनी धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वे प्रकल्पातील तुळजापूर–सोलापूर या उर्वरित मार्गाचे तातडीने टेंडर काढून काम सुरू करावे, अशी प्रमुख मागणी केली. तसेच धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालयाची स्थापना, कृष्णा–मराठवाडा सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा, नांदेड–पनवेल एक्सप्रेसला ढोकी येथे थांबा, लातूर–मुंबई रेल्वेला कळंब रोड स्थानकावर थांबा आणि हरंगुळ–हडपसर रेल्वे सेवा पुणे स्थानकापर्यंत विस्तारण्याची मागणीही त्यांनी केली.

याशिवाय, जिल्ह्याच्या वाढत्या औद्योगिक, कृषी व नागरी वीज गरजा लक्षात घेऊन नवीन २०० केव्ही ईएचव्ही (EHV) उपकेंद्रांची उभारणी करण्यात यावी, तसेच बार्शी टेक्स्टाईल मिलचे आधुनिकीकरण करून ती तातडीने सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या उद्योगाच्या पुनरुज्जीवनामुळे परिसरातील हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नालाही त्यांनी प्राधान्य देत प्रधानमंत्री फसल विमा योजनेतील ट्रिगर निकषांमध्ये सुधारणा करून प्रत्यक्ष पीक नुकसानीच्या आधारे भरपाई देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली. विद्यमान निकषांमुळे अनेक पात्र शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहत असल्याचे त्यांनी गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी या मागण्या अत्यंत आवश्यक असल्याचे सांगताना खासदार निंबाळकर यांनी, गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व विषय सकारात्मकपणे ऐकून संबंधित मंत्रालयांमार्फत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती दिली.

यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग आप्पा बारणे, नरेश म्हस्के, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर उपस्थित होते.

Previous Post

धाराशिवचे विदारक वास्तव: साहेब ‘फेसबुक लाईव्ह’वर, मॅडम ‘व्हिजन २०३०’मध्ये आणि विद्यार्थी शिक्षकांसाठी रस्त्यावर!

Next Post

धाराशिव भाजपमधील गटबाजीवर प्रदेशाध्यक्षांची दखल

Next Post
धाराशिव भाजपमधील गटबाजीवर प्रदेशाध्यक्षांची दखल

धाराशिव भाजपमधील गटबाजीवर प्रदेशाध्यक्षांची दखल

ताज्या बातम्या

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा : कोणते अधिकारी निलंबित?

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना ‘राजाश्रय’

August 10, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या

August 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास

August 9, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव तालुक्यात गायी विक्रीच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक!

August 9, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मागील भांडणाचा राग मनात धरून अचलेर येथे एकास मारहाण; मुरुम पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल

August 9, 2026

Recent Posts

  • धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना ‘राजाश्रय’
  • ३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या
  • कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास
  • धाराशिव तालुक्यात गायी विक्रीच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक!
  • मागील भांडणाचा राग मनात धरून अचलेर येथे एकास मारहाण; मुरुम पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!