उमरगा – उमरगा शहरातील धनलक्ष्मी कॉलनी येथे एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 3 लाख 26 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालाजी काशिनाथ दंडगे (वय 38, रा. धनलक्ष्मी कॉलनी, एकोंडी रोड, उमरगा) यांच्या घराचे कुलूप शुक्रवारी (दि. 19 जानेवारी 2025) दुपारी 2 ते सायंकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने तोडले. घरात प्रवेश करून कपाटातील 102 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 10 तोळे चांदीचे दागिने असा एकूण 3 लाख 26 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
दंडगे यांनी शनिवारी (दि. 20 जानेवारी 2025) उमरगा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 380 (1), 454 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.