• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

स्वतःची शेतजमीन विकून बेंबळीच्या वाघे आजीने पांडुरंगाच्या चरणी 18 लाखाचे सोने केले दान

श्री विठ्ठल मंदिराला 26 तोळ्याचा करदोडा आणि सोन्याच्या गंठण अर्पण

admin by admin
October 19, 2023
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
स्वतःची शेतजमीन विकून बेंबळीच्या वाघे आजीने पांडुरंगाच्या चरणी 18 लाखाचे सोने केले दान
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

बेंबळी – दौलत असून उपयोग नाही, दानत असली पाहिजे … या म्हणीला सत्यात आणत धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील वाघे आजीने स्वतःची जमीन विकून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी चरणी 18 लाखाचे सोन्याचे दागिने दान केले आहेत, वाघे आजीने आतापर्यंत विविध देवस्थानाला 50 लाखाचे दान केले आहे.

धाराशिव तालुक्यातील बेंबळी गावच्या लिंबाबाई वाघे या 80 वर्षाच्या आजीला मुल बाळं नसुन पतीचेही ५० वर्षांपूर्वी निधन झाले आहे. वाघे बाई यांनी आता पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी 50 लाख रुपयापैक्षा जास्त सोने.चांदी अशा वेगवेगळ्या स्वरुपात दान केले आहे.


११ पैकी  सहा एकर जमीन विकून एवढ दान करणाऱ्या वाघे यांच्या घरी लाईट नाही आणि स्वयपाकसाठी गॅस देखील नाही, चुलीवर स्वयंपाक केला जातो.आपल्या घरातील वीजेची जोडणीही लिंबाबाई वाघे यांनी तोडून टाकली आहे. रात्रीचा वेळ केवळ मिणमिणत्या दिव्याच्या सानिध्यात जातो. घरात पाण्यासाठी घागर, धान्य ठेवण्यासाठी जुन्या पद्धतीची खापराची भांडी, दोन तीन साड्या असेच साहित्य सोबत असते. वार्धक्य आलेले असतानाही स्वयंपाक आणि अन्य कामे स्वतःच करतात.

स्वतःची शेतजमीन विकून विठ्ठल रुक्मिणी चरणी 18 लाखाचे दागिने श्री विठ्ठल मंदिराला  दान करणाऱ्या वाघे आजीचे सर्वत्र कौतुक होत आहे.समाजात एकीकडे दुसऱ्याचे लुबाडणाऱ्यांची संख्या वाढत असताना, लिंबाबाई वाघे यांच्या श्रद्धेची, दानपणाची आणि समर्पणाची धाराशिव जिल्ह्यासह राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे.

मला लेंकरुबाळ नाही, नवराही सोडून गेलाय… माझी इठ्ठलावर लै श्रद्धा हाय… तोच मला जगण्याची ताकद देतो…माझ्या माघारी शेती ठेवून काय करायचं हाय म्हणून इठ्ठलाला सोन्याचा कडदोरा आणि रुक्मणीला गंठण केलं आणि लै दिसांची इच्छा पूर्ण झाली …
– लिंबाबाई वाघे, बेंबळी

व्हिडीओ पाहा

 

Previous Post

नळदुर्गजवळ ट्रकने धडक दिल्याने एक ठार

Next Post

तुळजापूर नवरात्रौत्सवात ११ चोरट्यांना ठोकल्या बेड्या

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

तुळजापूर नवरात्रौत्सवात ११ चोरट्यांना ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026

Recent Posts

  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!