• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, November 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंड्यात गोवंश जनावरांची कत्तल, ५०० किलो मांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
May 24, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा : गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी तसेच सात गोवंशीय वासरांना क्रूरतेने डांबून ठेवल्याप्रकरणी परंडा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवार, दिनांक २३ मे २०२५ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पल्ला गल्ली, कुर्डूवाडी रोड, परंडा येथे करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ५०० किलो गोमांस आणि सात जिवंत वासरे जप्त केली असून, एकूण मुद्देमालाची किंमत १ लाख ३५ हजार रुपये इतकी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फारुक इब्राहिम कुरेशी (वय ४३ वर्षे) आणि इरशाद चाँद कुरेशी (वय २८ वर्षे, दोघे रा. पल्ला गल्ली, परंडा) यांनी गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्याचे मांस स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगले होते. तसेच, सात गोवंशीय वासरांचे पालनपोषण न करता त्यांना निर्दयतेने डांबून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या माहितीच्या आधारे परंडा पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन नमूद व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाचे कलम ५(क), ९, ९(अ), (ब) तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियमाचे कलम ११(१), ११(१)(च), ११(१)(ज), ११(१)(झ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

कसबे तडवळे आठवडी बाजारात आर्थिक वादातून मारहाण

Next Post

उमरग्यात हुतात्मा स्मारक परिसरात गांजा सेवन करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

उमरग्यात हुतात्मा स्मारक परिसरात गांजा सेवन करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!

तुळजापुरात १८ वर्षीय समीर पटेल याची प्रेम प्रकरणातून हत्या ! घरात डांबले, मोबाईल हिसकावले अन्…

November 4, 2026
तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!

तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!

November 4, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; शाळेतील सोलार बॅटऱ्या, सोन्याचे टॉप्स आणि दोन दुचाकी लंपास

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथून २० वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उसाच्या बगॅसच्या व्यवहारातून श्रीवर्धन ॲग्रो कारखान्यात राडा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

November 4, 2026

Recent Posts

  • तुळजापुरात १८ वर्षीय समीर पटेल याची प्रेम प्रकरणातून हत्या ! घरात डांबले, मोबाईल हिसकावले अन्…
  • तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; शाळेतील सोलार बॅटऱ्या, सोन्याचे टॉप्स आणि दोन दुचाकी लंपास
  • धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथून २० वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल
  • उसाच्या बगॅसच्या व्यवहारातून श्रीवर्धन ॲग्रो कारखान्यात राडा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!