• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, November 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव राजकारण भाग ५: DPC बैठकीत ड्रग्जवरून ‘तू तू-मैं मैं’, बाहेर राणा पाटलांची गाडी घसरली;

म्हणाले, 'कळंबच्या पत्रकारांची नार्को टेस्ट करा!'

admin by admin
May 3, 2025
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिव राजकारण भाग ५: DPC बैठकीत ड्रग्जवरून ‘तू तू-मैं मैं’, बाहेर राणा पाटलांची गाडी घसरली;
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: मंडळी, १ मे ची DPC बैठक म्हणजे जणू एका तिकिटात दोन पिक्चर! जिथे एका पडद्यावर २६८ कोटींच्या निधीवरून महाभारत सुरू होतं, तिथेच दुसऱ्या पडद्यावर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून जोरदार रामायण घडलं!

झालं असं की, बैठकीत शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा उचलला. म्हणाले, “अहो, २२ आरोपी महिना झाला फरार आहेत, पोलीस काय करत आहेत? आणि मी यावर आवाज उठवला तर एका आरोपीचा भाऊ माझाच बाप काढतोय!” ओमराजेंचा पारा चढलेला असतानाच, भाजप आमदार राणा पाटील मध्ये पडले. म्हणाले, “अहो, राजकारण करून उगाच तुळजापूरला बदनाम केलं जातंय!” मग काय विचारता, दोघांमध्ये अशी काही ‘तू तू-मैं मैं’ जुंपली की विचारायची सोय नाही!

पण खरी कॉमेडी तर बैठकीनंतर झाली!

बैठकीतून बाहेर आल्यावर मीडियाने राणा दादांना गराडा घातला. दादांनी माईक हातात घेतला, सुरुवातीला जिल्ह्याच्या हिताच्या, जबाबदार पत्रकारितेच्या गप्पा मारल्या. तुळजापूरचं नाव कसं उगाच घेतलं जातंय यावर खंत व्यक्त केली. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण मग अचानक दादांची गाडी सुसाट सुटली आणि थेट कळंबच्या स्टॉपवर जाऊन थांबली!

म्हणाले, “आता परंडा बघा, कोण नाव घेतंय का? कळंब बघा, कोण नाव घेतंय का?” मग टीव्ही चॅनलच्या पत्रकारांकडे वळून म्हणाले, “कळंबची माहिती तुम्हाला माहिती असताना पोलिसांनी दिली नाही!” (हे लॉजिक पत्रकारांनाही कळलं नाही म्हणे!). आणि मग सोडला एकदम ‘ब्रह्मास्त्र’ टाईप बॉम्ब! दादा गरजले, “खरं तर कळंबच्या पत्रकारांची नार्को टेस्टच केली पाहिजे!”

काय??? नार्को टेस्ट? पत्रकारांची? कशासाठी?

हे ऐकून तिथे उपस्थित पत्रकार (विशेषतः कळंबवाले!) नुसते थिजले. एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. विषय चालला होता तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा, वाद झाला होता ओमराजेंशी, आणि दादा थेट कळंबच्या पत्रकारांच्या नार्को टेस्टवर कसे पोहोचले, हे कुणालाच कळेना!

आणि यातला ट्विस्ट ऐका!

दादा ज्या कळंबच्या पत्रकारांवर घसरले, ती मंडळी म्हणजे जिल्ह्याच्या बातम्या मुंबईच्या मोठ्या चॅनल्सपर्यंत पोहोचवणारे मुख्य ‘शिलेदार’! न्यूज १८ चे बालाजी निरफळ, एबीपी माझाचे आप्पा शेळके, झी २४ तासचे ज्ञानेश्वर पतंगे, साम मराठीचे बालाजी सुरवसे, एनडीटीव्हीचे ओंकार कुलकर्णी… हे सगळे  पत्रकार कळंबचेच रहिवासी! म्हणजे दादांनी चुकून मधमाश्यांच्या पोळ्यावरच दगड मारला की काय, अशी कुजबुज आता सुरू झालीये! (फक्त टीव्ही ९ चे श्रीराम क्षीरसागर आणि लोकशाहीचे काका कांबळे हे धाराशिवचे, तर पुढारीचे रहीम शेख हे तुळजापूरचे आहेत, ही अधिकची माहिती!)

निष्कर्ष: तर मंडळी, धाराशिवच्या राजकारणाची ही सिरीज आता क्राईम, सस्पेन्स, कॉमेडी अशा सगळ्या जॉनरला स्पर्श करत आहे. DPC निधी, भाऊबंदकी, इस्तीफा ऑफर, हुकलेलं उपोषण आणि आता हे नार्को टेस्ट प्रकरण! आता कळंबचे पत्रकार यावर काय भूमिका घेणार? राणा दादा ‘सॉरी’ म्हणणार की आणखी काही नवीन ‘खुलासा’ करणार? तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचे आरोपी कधी सापडणार? अनेक प्रश्न आहेत, उत्तरं मात्र… वेट अँड वॉच!

Video

Previous Post

अजित दादा आणि ‘योग’ – एक अतूट (उप)कहाणी!

Next Post

हिंगळजवाडीत दोन गटांत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

हिंगळजवाडीत दोन गटांत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा

November 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; म्हशी, स्कुटी, मोबाईल आणि दुचाकी लंपास

November 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरग्यात विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

November 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

नंदगाव शिवारात २४ एकर सोयाबीनच्या बनीमला आग; शेतकऱ्याचे ११ लाखांचे नुकसान

November 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंड्यात ४२ कामगारांना डांबून ठेवून १६ ते १७ तास काम; मारहाण, धमकी देत मोबदला न दिल्याचा आरोप

November 1, 2026

Recent Posts

  • कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; म्हशी, स्कुटी, मोबाईल आणि दुचाकी लंपास
  • उमरग्यात विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
  • नंदगाव शिवारात २४ एकर सोयाबीनच्या बनीमला आग; शेतकऱ्याचे ११ लाखांचे नुकसान
  • परंड्यात ४२ कामगारांना डांबून ठेवून १६ ते १७ तास काम; मारहाण, धमकी देत मोबदला न दिल्याचा आरोप
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!