• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्गच्या श्री खंडोबा देवाची यात्रा २ जानेवारीपासून; ५ ते ७ लाख भाविकांच्या उपस्थितीत निनादणार ‘येळकोट’चा जयघोष

admin by admin
December 26, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
नळदुर्गच्या श्री खंडोबा देवाची यात्रा २ जानेवारीपासून; ५ ते ७ लाख भाविकांच्या उपस्थितीत निनादणार ‘येळकोट’चा जयघोष
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग (मैलारपूर) येथील जागृत देवस्थान श्री खंडोबा देवाचा यात्रोत्सव २ ते ४ जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात आणि उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्याने नळदुर्ग परिसर सुवर्णमयी होण्यासाठी सज्ज झाला असून, या यात्रेसाठी सुमारे ५ ते ७ लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

धार्मिक महत्त्व आणि परंपरा

श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून महाराष्ट्रातील खंडोबाच्या एकूण १२ स्थानांपैकी नळदुर्गचे मैलारपूर हे दुसरे प्रमुख स्थान मानले जाते. विशेष म्हणजे श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह याच पवित्र ठिकाणी झाला, अशी आख्यायिका आहे. मागील दीड महिन्यांपासून येथे यात्रोत्सव सुरू असून,  पौष पौर्णिमेच्या यात्रेने या उत्सवाची सांगता होणार आहे.

३ जानेवारीला यात्रेचा मुख्य दिवस

यात्रेचा मुख्य दिवस शनिवार , ३ जानेवारी रोजी असणार आहे. या दिवशी पहाटे देवाचा अभिषेक आणि महापूजा संपन्न होईल. दिवसभर भाविकांचे नवस फेडण्याचे कार्यक्रम, तसेच पारंपरिक वाघ्या-मुरळी नृत्य सादर केले जातील. यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध गावांमधून येणाऱ्या जवळपास सातशे नंदीध्वज (काठ्या).

मध्यरात्रीचा नयनरम्य सोहळा

३ जानेवारीच्या रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अणदूर आणि नळदुर्ग येथील मानाच्या काठ्यांचे आगमन मंदिरात होईल. यावेळी होणारी आतषबाजी आणि शोभेच्या दारूचे काम पाहण्यासारखे असते. दोन्ही गावांच्या मानकऱ्यांचा सत्कार आणि वाजतगाजत निघणारा छबिना याने यात्रेची सांगता होईल. भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेले भक्तगण हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य असते.

प्रशासकीय सज्जता

भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थांनकडून दर्शन बारीची (रांग) व्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रा यशस्वी आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मंदिर समिती, यात्रा कमिटी आणि नळदुर्ग नगरपरिषद अहोरात्र मेहनत घेत आहेत.

४ जानेवारी रोजी जंगी कुस्त्यांचा आखाडा

४ जानेवारी रोजी , मंदिर परिसरातील मैदानावर नळदुर्ग यात्रा कमिटीच्या वतीने जंगी कुस्त्यांचा आखाडा भरणार आहे. याठिकाणी विविध गावातील मल्ल आपले डावपेच दाखवणार आहेत, विजेत्यांना ५ हजार पासून ५१ हजार पर्यंत बक्षिस देण्यात येणार आहे.

Previous Post

नवीन वर्षाच्या तोंडावर तुळजाभवानीचे दर्शन महागले; ‘व्हीआयपी’ पासच्या दरात मोठी वाढ!

Next Post

विमा कंपन्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; पीक विम्याच्या १२ हजार रद्द अर्जांची होणार फेरछाननी

Next Post
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जनता दरबार’ सुरू, नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार

विमा कंपन्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; पीक विम्याच्या १२ हजार रद्द अर्जांची होणार फेरछाननी

ताज्या बातम्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026

Recent Posts

  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!