अंबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेळगाव माणिक नगर येथील माणिक बाबा देवास्थानातून १८ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ९ ते १९ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे ५ या वेळेत चांदीच्या पादुका चोरीला गेल्याची घटना घडली आहे. अंदाजे १५,००० रुपये किमतीच्या या पादुका अर्धा किलो वजनाच्या होत्या. देवस्थानाचे समाधीवर ठेवलेल्या या पादुका अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची तक्रार अर्जुन राम शेंडकर यांनी १९ ऑगस्ट रोजी पोलिसांकडे दिली. या प्रकरणी अंबी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०५(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
तुळजापूरमध्ये मोटरसायकल चोरी, गुन्हा दाखल
तुळजापूर येथील दापका तांडा येथे राहणाऱ्या विनोद राजू चव्हाण यांची अंदाजे ४०,००० रुपये किंमतीची होंडा एसपी शाईन मोटरसायकल १५ जुलै ते १६ जुलै दरम्यान काक्रंबा येथील विश्रांत बारमधून चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विनोद चव्हाण यांनी रविवारी (१९ ऑगस्ट) तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.