• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गोमांसाबद्दल मिळाली टीप, पण सापडला लाखो रुपयांचा गुटखा; तामलवाडी पोलिसांची कारवाई, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
December 29, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
गोमांसाबद्दल मिळाली टीप, पण सापडला लाखो रुपयांचा गुटखा; तामलवाडी पोलिसांची कारवाई, १० लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
407
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तामलवाडी: सोलापूरकडून तुळजापूरकडे जाणाऱ्या एका इनोव्हा कारमधून गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, पोलिसांनी थरारक पाठलाग करून गाडी पकडली असता, त्यात गोमांस नसून शासनाने बंदी घातलेला सुगंधी तंबाखू आणि विमल गुटखा आढळून आला. ही धडाकेबाज कारवाई तामलवाडी पोलिसांनी सोमवारी (दि. २९) पहाटे १ वाजेच्या सुमारास मॉडर्न हायस्कूल समोर केली. या कारवाईत पोलिसांनी कारसह एकूण ९ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांना २९ डिसेंबर २०२५ रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, सोलापूरकडून तुळजापूरकडे जाणाऱ्या इनोव्हा कारमधून (क्र. एम एच १३, ए एक्स १७३८) गोमांसाची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे तामलवाडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचला आणि सदर कारचा पाठलाग करून मॉडर्न हायस्कूल समोर गाडी अडवली.

पोलिसांनी कारमधील दोन इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे इब्राहीम सलीम शेख (रा. बेगम पेठ, सोलापूर) आणि सोहेल अहेमद कुरेशी (रा. सिद्धेश्वर पेठ, सोलापूर) अशी सांगितली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता, त्यांना आत गोमांस ऐवजी सुगंधी सुपारी, विमल आणि तंबाखूची पोती आढळून आली.

या कारवाईत पोलिसांनी विमल आणि तंबाखूची २० पोती असा एकूण ५ लाख ९६ हजार रुपयांचा गुटखा आणि गुन्ह्यात वापरलेली कार, असा एकूण ९ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप टेकाळे, तसेच पोलीस अंमलदार उमेश माने, तुराब शेख, सुरज नरवडे, दिनकर तोगे, जुबेर काझी आणि मिथुन गायकवाड यांच्या पथकाने केली.

Previous Post

 तुळजापूर: शासकीय जागेवरील ‘छत्रपती एक्झिक्युटिव्ह’चे अतिक्रमण न काढल्यास ३१ डिसेंबरला आत्मदहन

Next Post

धाराशिव : बनावट आधारकार्डद्वारे वय वाढवून लावला बालविवाह; अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तरुणावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा

Next Post
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव : बनावट आधारकार्डद्वारे वय वाढवून लावला बालविवाह; अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तरुणावर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

येरमाळा बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन धाडसी चोरी!

July 17, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर बायपासवर पोलिसांची मोठी कारवाई! एक्सयुव्ही ५०० कारमधून चाललेली २०० किलो गोवंशीय मांसाची तस्करी उधळली

July 17, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंबमध्ये भररस्त्यात थरार! देशमुख हॉस्पिटलसमोर तरुणावर दगडाने प्राणघातक हल्ला

July 17, 2026
वारी मोजायची नसते, वारी पेरायची असते!

वारी मोजायची नसते, वारी पेरायची असते!

July 17, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरीच्या घटना; दागिने, रोकड व दोन कालवडी लंपास

July 16, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!