तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना दिलेल्या ७२ तासांचा अल्टिमेटम संपला आहे. मात्र, ड्रग्ज पेडलर अद्याप फरारच असून, ७२ तास उलटले तरी एकही नवा आरोपी गजाआड पडलेला नाही!
👮 “बदली”च्या खेळात पोलिसांची जबाबदारी संपली?
या प्रकरणात पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी केलेली कारवाई म्हणजे वादग्रस्त पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांची बदली. मात्र, येथेही एक ट्विस्ट आहे!
➡️ खांडेकर यांची बदली पोलीस मुख्यालयात होण्याची अपेक्षा होती, पण त्यांना धाराशिवच्या आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आले!
➡️ यामुळे हा बदल शिस्तभंगाची कारवाई की प्रमोशन? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
⏳ कारवाई की फक्त नाटक?
- ७२ तास उलटले, तरीही तुळजापुरातील ड्रग्ज पेडलर अजूनही पोलिसांच्या हाती नाही.
- तपास वेगवान होईल असे वाटत असताना, प्रत्यक्षात आरोपींवर कोणतीही नवी कारवाई झालेली नाही.
- आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याने पोलीस यंत्रणेंच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
🔥 पुढे काय?
- पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची पुढील भूमिका काय असेल?
- पोलिसांकडून तपासाचा वेग वाढवला जाणार की पुन्हा वेळकाढूपणा?
- तुळजापूरमध्ये ड्रग्जचा प्रभाव संपवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील का?
🚨 यावर पुढील २४ तास महत्त्वाचे ठरणार आहेत!