• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भाविकांना रुम विचारल्याच्या रागातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; जातीवाचक शिवीगाळप्रकरणी ५ जणांवर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा

admin by admin
April 14, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
1.9k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : भाविकांना ‘राहण्यासाठी रुम पाहिजे का?’ अशी विचारणा करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना तुळजापूर शहरातील घाटशीळ पार्किंग परिसरात घडली. ‘तू भाविकांना का बोलतोस’ याचा जाब विचारत या टोळक्याने तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केली आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. रविवारी (ता. ५ एप्रिल) रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी सूरज दुशांत रसाळ (वय २५, रा. वेताळ नगर समाज मंदिराजवळ, तुळजापूर) या तरुणाने सोमवारी (ता. १३) तुळजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पाच जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश कांबळे, साहिल शेख, लिलेश अमृतराव, भगवान पारधे आणि शंकर पारधे (सर्व रा. तुळजापूर, जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूरज रसाळ हे रविवारी (ता. ५) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घाटशीळ पार्किंग परिसरात उभे होते. यावेळी ते दर्शनासाठी आलेल्या भाविकांना ‘तुम्हाला राहण्यासाठी रुम पाहिजे का?’ असे विचारत होते. याच वेळी आरोपींनी तिथे येऊन ‘तू भाविकांना का बोलतोस?’ असे म्हणत सूरजशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादातून पाचही आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून सूरजला जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. तसेच, ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी जीवे मारण्याची धमकीही या टोळक्याने दिली.

घटनेनंतर उपचाराअंती सूरज रसाळ याने दिलेल्या प्रथम खबरीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११७(२), ३५२, ३५१(३), १८९(२), १९१(२), १९१(३) सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी – अ.जा.ज.प्र.का. कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(व्हीए)) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलिस करत आहेत.

Previous Post

धाराशिव : घरभाड्याच्या वादातून घरमालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरफोडी, दुचाकीसह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरफोडी, दुचाकीसह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

ताज्या बातम्या

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

संपादकीय: सत्तेचा माज की गुंडगिरी? तुळजाभवानी मंदिरात अधिकाऱ्यांना शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही!

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!