• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेतातून ट्रॅक्टर आणि जेसीबी नेण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी

नारंगवाडी येथील घटना; उमरगा पोलीस ठाण्यात आठ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

admin by admin
May 11, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा : शेतातून ट्रॅक्टर आणि जेसीबी नेण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद होऊन तुंबळ हाणामारी झाल्याची घटना उमरगा तालुक्यातील नारंगवाडी शिवारात रविवारी (ता. १०) दुपारी घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारींवरून उमरगा पोलीस ठाण्यात तब्बल आठ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत पहिली फिर्याद उमेश दिनकर ठाकूर (वय ३२, रा. नारंगवाडी) यांनी दिली आहे. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नारंगवाडी शिवारातील गट नं. २११/१४ मध्ये शेतातून ट्रॅक्टर नेण्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी मुकेश सदानंद पवार, गजानन सदानंद पवार, सदानंद नामदेव पवार आणि संगीता नामदेव पवार (सर्व रा. नारंगवाडी) यांनी उमेश यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून जखमी केले व ‘तुला सोडणार नाही’ अशी धमकी दिली. या फिर्यादीवरून वरील चार जणांवर उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, याच घटनेत दुसऱ्या गटाच्या वतीने मुकेश सदानंद पवार (वय ३१, रा. नारंगवाडी) यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. गट नं. २१५ मधील उसाच्या पिकातून जेसीबी आणि ट्रॅक्टर का घातले, अशी विचारणा मुकेश पवार यांनी केली होती. याचा राग आल्याने बालाजी ठाकूर, दिनकर ठाकूर, उमेश दिनकर ठाकूर आणि निलेश बालाजी ठाकूर (सर्व रा. नारंगवाडी) यांनी मुकेश यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि स्टीलच्या कळशीने मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांनाही बघून घेण्याची धमकी दिली.

या परस्परविरोधी तक्रारींवरून उमरगा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील एकूण आठ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. शेतीच्या कारणावरून एकाच गावातील दोन गटांत हाणामारी झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीचे सत्र; परंड्यात महिलेला मारहाण करून लूट, तर तीन दुचाकींसह ट्रकचा माल लंपास

Next Post

मत्स्य आयुक्तांकडे तक्रार केल्याच्या रागातून महिलेवर कोयत्याने हल्ला; दागिने व रोकड लुटली

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मत्स्य आयुक्तांकडे तक्रार केल्याच्या रागातून महिलेवर कोयत्याने हल्ला; दागिने व रोकड लुटली

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026

Recent Posts

  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!