• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, June 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जुन्या वादातून महिलेस दगडाने मारहाण, जीवे मारण्याची धमकी; तुगाव येथील घटनेप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 22, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
0
SHARES
485
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी : जुन्या वादाच्या कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवून एका ४५ वर्षीय महिलेला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना तुगाव (ता. धाराशिव) येथे घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली असून, ढोकी पोलीस ठाण्यात तब्बल ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री भैरवनाथ गडकर (वय ४५, मूळ रा. तुगाव, हल्ली मुक्काम माझगाव, मुंबई) असे मारहाणीत जखमी झालेल्या फिर्यादी महिलेचे नाव आहे. तर नेताजी शिवाजी गडकर, शिवाजी गडकर, धनाजी गडकर, अंकुश गडकर, बबन गडकर, सुनंदा गडकर, पार्वती गडकर, सुचिता गडकर, बालिका गडकर, प्रियांका गडकर आणि संभाजी गडकर (सर्व रा. तुगाव, ता. जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

जयश्री गडकर या मूळच्या तुगाव येथील असून सध्या त्या मुंबईतील माझगाव येथे राहतात. सोमवारी (ता. २० एप्रिल) रात्री ९ वाजेच्या सुमारास त्या तुगाव येथे असताना नमूद आरोपींनी मागील भांडणाचा राग मनात धरून गैरकायद्याची मंडळी जमवली. त्यांनी जयश्री यांना गाठून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्या जखमी झाल्या. याशिवाय आरोपींनी त्यांना ‘तुला जिवे ठार मारू’ अशी गंभीर धमकीही दिली.

या हल्ल्यानंतर जयश्री गडकर यांनी मंगळवारी (ता. २१ एप्रिल) ढोकी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. त्यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून सर्व ११ आरोपींविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५, १९१(२), १९०, ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ढोकी पोलीस करत आहेत.

Previous Post

‘शेत का विकले?’ या रागातून प्रौढास दगडाने मारहाण; चिंचपूर ढगे येथील घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारांचा सुळसुळाट; घरफोडी, चोरीसह ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारांचा सुळसुळाट; घरफोडी, चोरीसह ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये खळबळजनक: डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या

धाराशिवमध्ये खळबळजनक: डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या

June 8, 2026
धाराशिव ग्रामीण पोलिसांवर लाच मागितल्याचा व मारहाणीचा आरोप

धाराशिव ग्रामीण पोलिसांवर लाच मागितल्याचा व मारहाणीचा आरोप

June 8, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा हैदोस! वाशी तालुक्यात घरफोडी करून ६० हजारांचे सोयाबीन लंपास; काटगावमध्ये ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा मोटार गायब

June 8, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम बसस्थानकावर विचित्र वादातून राडा! ‘सुरेश पवारसोबत फोटो का काढला’ म्हणत १६ वर्षीय मुलाला लाकडी फळीने बेदम मारहाण

June 8, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव ग्रामीण पोलिसांवर पैशांची वसुली केल्याचा गंभीर आरोप! जहागीरदारवाडीत ‘व्हिडीओ शूटिंग’वरून राडा; पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी ९ जणांवर गुन्हा

June 8, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group