• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

admin by admin
August 25, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अण्णाभाऊ साठे चौकात सापळा रचून एका सराईत दुचाकी चोरट्याला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून आनंदनगर, धाराशिव ग्रामीणसह औसा आणि कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या एकूण १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या ४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

नेमकी कारवाई कशी झाली?

पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व त्यांचे पथक २४ ऑगस्ट २०२६ रोजी धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करत होते.

या दरम्यान पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात एक इसम चोरीची मोटारसायकल घेऊन उभा आहे. माहिती मिळताच पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संशयिताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव परमेश्वर उर्फ सुरेश चंदर काळे (वय ४० वर्षे, रा. जुना बस डेपो जवळ, पारधी पिढी, धाराशिव) असे सांगितले.

४ दुचाकी जप्त; आंतरजिल्हा गुन्हे उघडकीस

सुरुवातीला आरोपीने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसी खाक्या दाखवून विश्वासात विचारपूस केली असता, त्याने विविध ठिकाणांवरून मोटारसायकली चोरून त्या लपवून ठेवल्याची कबुली दिली. पथकाने तातडीने त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता एकूण १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या ४ मोटारसायकली मिळून आल्या.

गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता या मोटारसायकली आनंदनगर, धाराशिव ग्रामीण, तसेच लातूर जिल्ह्यातील औसा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीसह जप्त केलेल्या दुचाकी पुढील कारवाईसाठी आनंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.

कारवाई करणारे पोलीस पथक

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस अंमलदार समाधान वाघमारे, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, महिला पोलीस अंमलदार शोभा बांगर, चालक पोलीस अंमलदार दहिहांडे आणि शेरखाने यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

१ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!

Next Post

तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

Next Post
तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

August 25, 2026
धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

August 25, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

१ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!

August 25, 2026
तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026

Recent Posts

  • तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;
  • धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त
  • १ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!
  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!