• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : अतिवृष्टी अनुदानापासून वंचित २१ मंडळातील शेतकर्‍यांना मिळणार दिलासा

admin by admin
January 17, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील
0
SHARES
3.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – खरीप २०२४ मध्ये सततच्या पावसामुळे मोठे पीक नुकसान होऊनही अनुदानापासून वंचित राहिलेल्या धाराशिव जिल्ह्यातील  २१ मंडळातील शेतकर्‍यांना मिळणार दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माहिती दिली आहे.

जिल्ह्यातील ५७ पैकी ३३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती, त्यानुसार १ लाख ८१ हजार शेतकऱ्यांना २२१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. परंतु, धाराशिव, भूम, परंडा आणि तुळजापूर तालुक्यातील २४ महसूल मंडळातील शेतकरी प्रचलित निकषांमुळे मदतीपासून वंचित राहिले होते.

याबाबत आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वस्तुनिष्ठ परिस्थितीचा विचार करून मदत देण्याची विनंती केली होती. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी मदत व पुनर्वसन खात्याच्या सचिवांना सूचना दिल्या होत्या. सचिवांनी विभागीय आयुक्तांमार्फत जिल्हाधिकार्‍यांकडून अहवाल मागवला होता. हा अहवाल सकारात्मक असून तो सचिवांकडे सादर झाला आहे. त्यामुळे मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आमदार पाटील यांनी सांगितले की, काही मंडळात सदोष पर्जन्यमापकांमुळे अतिवृष्टीची नोंद झाली नव्हती. त्यामुळे २०२२ साली ओढवलेल्या आपत्तीच्या वेळी ज्याप्रमाणे वस्तुनिष्ठ नुकसानीच्या निकषानुसार पाहणीचा अहवाल ग्राह्य धरून मदत देण्यात आली होती, त्याच धर्तीवर उर्वरित महसूल मंडळांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती.

आमदार पाटील यांनी स्वतः अनेक गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. त्यांच्या मते, सलग पाच दिवसांत ५० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे. परंतु, ‘सलग पाच दिवसांच्या कालावधीत प्रत्येक दिवशी किमान १० मिलीमीटर पाऊस झाल्यास’ या निकषात न बसल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर अनुकूलता दर्शविली असून वस्तुनिष्ठ पंचनाम्याच्या आधारे तयार केलेला सकारात्मक अहवाल मदत व पुनर्वसन सचिवांकडे सादर झाल्याने मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

Previous Post

उमरेगव्हाणमध्ये शेती व ट्रॅक्टर वाटणी वादातून दोन गटात हाणामारी

Next Post

तुळजापूर: सिंदफळ गावातील एनए लेआउट घोटाळा; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
तुळजापूरमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक

तुळजापूर: सिंदफळ गावातील एनए लेआउट घोटाळा; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १४ मे रोजी लागणार निकाल; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

April 20, 2026
महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

April 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group