• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

admin by admin
September 21, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

राजकारणात ‘नारळ फोडणे’ आणि ‘हात दाखवून अवलक्षण करणे’ यात फार बारीक अंतर असतं, याचा प्रत्यय सध्या धाराशिवच्या जनतेला चांगलाच येतोय. झालं असं की, छत्रपती संभाजीनगरात १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर शिवसेना (उबाठा) पक्षाने ‘तुमसे ना हो पाएगा’ म्हणत सरकारच्या कारभाराची पिसे काढली. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भरसभेत भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या ‘जल-अद्भुत चमत्कारा’चा पर्दाफाश केला; आणि काय आश्चर्य! राणा दादांच्या गोटात इतका मोठा राजकीय फटाका वाजला की, थेट धूर तुळजापुरात निघाला.

‘डिसेंबर २०२४’चं ते अदृश्य पाणी!

२०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर माहौल कसा तयार करायचा, यात राणा दादांचा हातखंडा. ‘कृष्णा-मराठवाडा सिंचन योजने’चं काम फत्ते झालंय, डिसेंबर २०२४ पर्यंत रामदरा तलावात लाटा उसळतील, असा दावा करत सिंदफळ पंप हाऊसवर नारळ फोडण्यात आला. कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकले, हारतुरे पडले, भाषणं झाली. पण आज दोन वर्षे उलटली, तरी रामदरा तलावात पाण्याचा थेंब नाही, फक्त कोरडी धूळ उडतेय! राणा दादांच्या ‘डिजिटल पाईपलाईन’मधून पाणी कधी प्रत्यक्षात जमिनीवर उतरणार, याचं उत्तर मात्र कोणाकडेच नाही. अंबादास दानवेंनी भरसभेत हाच साधा प्रश्न विचारला: “दादा, पाणी गेलं कुठं?”

सत्याचा झटका आणि कार्यकर्त्यांची नौटंकी

दानवेंनी नेमक्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवताच राणा दादांच्या कार्यकर्त्यांचा पार तिळपापड झाला. ‘तुझे मिर्ची लगी तो मैं क्या करू?’ या चालीवर कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण सोडून तुळजापुरात थेट दानवेंच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलनाचा फड मांडला. आता प्रश्न असा पडतो की, पाणी न आल्याची विचारणा केली म्हणून एवढा राग? की खोटं उघडं पडल्यामुळे जळफळाट?

दुष्काळाने होरपळणाऱ्या धाराशिवची आज अवस्था काय आहे? दोन महिन्यांपासून पाऊस नाही, उभं सोयाबीन डोळ्यादेखत करपून गेलं, गुरांच्या दावणीला चारा नाही, घशाला कोरड पडलीये आणि शेतकरी दुष्काळ जाहीर करा म्हणून टाहो फोडतायत. अशा गंभीर वेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाण्याचा हिशोब देण्याऐवजी, राणा दादांचे शिलेदार रस्त्यावर उतरून जोडे आपटण्यात धन्यता मानत आहेत!

जोड्यांना दुग्धाभिषेकाचे उत्तर

भाजपच्या या बालीश नौटंकीला शिवसैनिकांनीही जोरदार शैलीत प्रत्युत्तर दिलं. दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत शिवसैनिकांनी दाखवून दिलं की, जोडे मारल्याने जनतेच्या डोळ्यातली धूळ साफ होत नसते. उलट, तुमची पोलखोल झाली की तुम्ही किती अस्वस्थ होता, हेच यातून सिद्ध झालं.

राणा दादा, राजकारण भाषणांवर आणि उद्घाटनांच्या पाट्यांवर चालतं, पण शेती आणि माणसांचा घसा पाण्यानेच ओला होतो. निवडणुका आल्या की पंप हाऊसचे फिती कापणे सोपे असते, पण दोन वर्षानंतरही कोरड्या पडलेल्या पाटांकडे बघून जनतेला जाब देणे कठीण असते. जनतेच्या हक्काच्या कृष्णा-मराठवाडा योजनेवर प्रश्न विचारले तर मिरच्या झोंबणारच; पण कितीही आदळआपट केली तरी मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचा हिशोब तर द्यावाच लागेल!

Previous Post

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

ताज्या बातम्या

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026

Recent Posts

  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!