धाराशिव: शहरातील गडपाटी जवळील प्रियंका ढाब्यावर जेवणाच्या बिलाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धिरज विठ्ठल वाघमारे (रा. शिंगोली, ता. जि. धाराशिव) यांनी ४ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता प्रियंका ढाब्यावर फिर्यादी निशांत गौतम गायकवाड (वय २६, रा. शिंगोली) यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तसेच कोयत्याने मारहाण केली. तसेच त्यांना जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.
या हल्ल्यात जखमी झालेल्या निशांत गायकवाड यांनी ५ मार्च २०२५ रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून आनंदनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भा.न्या.सं.कलम 118(1),115(2)द्व 352, 351(2), 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.
नळदुर्गमध्ये वाळूच्या पैशांवरून युवकाला मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल
नळदुर्ग: वाळूच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका युवकाला तिघांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना नळदुर्गमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इलीयास अकलाख शेख, साबेर शेख आणि अकबर अकलाख शेख (सर्व रा. धाराशिव, ता. जि. धाराशिव) यांनी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता बालाघाट कॉलेज, नळदुर्ग समोर फिर्यादी ताजोद्दीन बशीर अहमद शेख (वय २४, रा. रहीमनगर, नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांना वाळूच्या पैशांच्या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी सळई व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच त्याला जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.
या घटनेबाबत जखमी ताजोद्दीन शेख यांनी ५ मार्च २०२५ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2),352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.