उमरगा: शहरातील एसबीआय बँकेसमोर दोन अनोळखी व्यक्तींनी एका महिलेची चलाखीने फसवणूक करत तब्बल 42,500 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेखा लहु बिराजदार (वय ५५, रा. चिंचकोट, ह.मु. बेडगा, ता. उमरगा, जि. धाराशिव) या ४ मार्च २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता एसबीआय बँकेसमोर असलेल्या हॉटेलजवळ उभ्या असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या अंगावर काहीतरी पडल्याचे सांगितले. घाबरून त्यांनी साडीवरील गहाण साफ करण्यासाठी हात फिरवला, त्याच क्षणी त्या दोघांनी बाजूला ठेवलेली पर्स उचलून पळ काढला.
पर्समध्ये १८ ग्रॅम सोन्याची साखळी, घड्याळ व ४,५०० रुपये रोख रक्कम असा मिळून ४२,५०० रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी ५ मार्च २०२५ रोजी सुरेखा बिराजदार यांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून भा.न्या.सं.कलम 318(4),318(2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी भामट्यांचा शोध सुरू केला असून, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.