उमरगा – उमरगा शहरातील विविध ठिकाणी गुंगीकारक गांजा पदार्थ चिलीममध्ये भरून सेवन करताना पोलिसांनी चौघांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, दिनांक 5 मार्च 2025 रोजी दुपारी 2.40 ते 3.30 वाजेच्या दरम्यान, उमरगा शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी संशयास्पद हालचाली आढळून आल्या. तपासणी दरम्यान, आरोपी दत्तात्रय चंद्रकांत कांबळे (18, आलूर, उमरगा, धाराशिव), बालाजी मारोती वाघमोडे (23, शिरूर, आळंद, गुलबर्गा), ऋषीकेश चंद्रकांत कांबळे (25, जकेकुर, उमरगा, धाराशिव) आणि राहुल दिगंबर पाटील (31, शिरूर, आळंद, गुलबर्गा) हे गांजा पदार्थ चिलीममध्ये भरून सेवन करत असल्याचे आढळले.
यावरून उमरगा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सरकारतर्फे प्रथम खबरीवरून एन.डी.पी.एस अफक्ट 1985 कलम 8 (सी), 27 अन्वये अंतर्गत गुन्हे दाखल केले. या प्रकरणी उमरगा पोलिस अधिक तपास करत आहेत.