बेंबळी पोलिसांनी गुटखा वाहतुकीवर केलेल्या संशयास्पद कारवाईबाबत ‘धाराशिव लाइव्ह’ ने बातमी प्रसिद्ध करताच याचा त्वरित परिणाम दिसू लागला. आधी एफआयआरमध्ये उल्लेख नसलेली आणि तपासातून गायब झालेली गुटखा वाहतूक करणारी कार अखेर पोलिसांनी जप्त केली आहे. मात्र, या गाडीचा उल्लेख आधी गुन्ह्यात का केला नव्हता, याबद्दल अनेक तर्कवितर्क सुरू आहेत.
दरम्यान, आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगितले असले तरी, आधीच त्यांना परस्पर जामीन घेण्यास सांगितल्यामुळे हा शोध किती प्रभावी ठरणार, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
बातमीचा तात्काळ प्रभाव!
गुटखा वाहतूक प्रकरणात धाराशिव लाइव्हने पोलीस कारवाईतील तफावतींवर प्रकाश टाकताच स्थानिक बेंबळी पोलिसांवर मोठा दबाव आला. त्यामुळेच हरवलेली कार अचानक जप्त झाली. आता प्रश्न उरतो तो पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी किती गंभीर प्रयत्न केले जात आहेत?
आता पुढे काय?
▪ गाडी जप्त झाली, पण एवढे दिवस ती कुठे होती?
▪ आरोपी फरार आहेत की “गायब” करण्यात आले आहेत?
▪ बेंबळी पोलिसांच्या भूमिकेवर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार?
- गुटखा तस्करीत एका बिट अंमलदार मॅडमचा भाऊ अडकला आहे. त्या मॅडमच्या आशीर्वादामुळे हा गोरखधंदा सुरु होता. त्याची चौकशी होणार का ?
धाराशिव लाइव्ह या प्रकरणावर लक्ष ठेऊन असून, पुढील अपडेटसाठी वाचत राहा!
बेंबळी पोलिसांची गुटखा नाटिका – गाडी गायब, गुन्हेगार उडाले!