परंडा: जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना परंडा तालुक्यातील घारगाव येथे घडली. कृष्णा बाबासाहेब आवटे यांनी सचिन रामहरी सुरवसे यांना लोखंडी कुऱ्हाडीने तोंडावर मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली आहे.
तामलवाडी: गायी कापून चमडीचा व्यापार करतात असा आरोप करत आठ जणांनी एका वृद्धाला मारहाण केल्याची घटना तामलवाडीत घडली. प्रज्वल राउत, गणेश साळुंके, ओम जगताप, योगेश घोडके, ज्योतीलराम मुळे, माउली गुंड, पवार आणि चौगुले यांनी असगर हुसेन शेख यांना रस्त्यात गाडी आडवून मारहाण केली.दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.