• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! धाराशिवच्या २२ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात १५ कृषी अधिकारी निलंबित

सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांचाही समावेश

admin by admin
August 6, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! धाराशिवच्या २२ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात १५ कृषी अधिकारी निलंबित
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव |  धाराशिव जिल्ह्यातील २२ कोटी रुपयांच्या कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी राज्यभरात खळबळ उडवणारी मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणातील १५ कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईत धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कृषी विभागात एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत २०२५-२६ या वर्षात शेतकऱ्यांना मोफत बियाणे, बीजप्रक्रिया औषधे आणि इतर कृषी निविष्ठांचे वितरण करण्यात आले होते. मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार समोर आल्यानंतर चौकशी सुरू झाली. सुरुवातीला सुमारे १२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र चौकशीदरम्यान घोटाळ्याची व्याप्ती वाढत जाऊन ती २२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले.

या प्रकरणाची तक्रार १२ एप्रिल २०२६ रोजी कृषी विभागाकडे दाखल झाली होती. त्यानंतर विविध स्तरावर चौकशी सुरू झाली. या चौकशीत गंभीर त्रुटी आणि कथित अनियमितता समोर आल्याने अखेर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

या घोटाळ्याचा मुद्दा शिवसेना (ठाकरे गट)चे आमदार कैलास पाटील यांनी सातत्याने लावून धरला होता. २ मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी हा विषय उपस्थित करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्यानंतरच या प्रकरणाला गती मिळाल्याचे मानले जात आहे.

या कारवाईमुळे राज्यातील कृषी विभागात मोठी खळबळ उडाली असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा शासनाचा स्पष्ट संदेश या निर्णयातून दिला गेल्याचे मानले जात आहे.

 

Previous Post

‘माऊली’चा युटर्न, आयफोनचं रहस्य आणि राणा साहेबांची ‘ब्लंडर बँक’!

Next Post

‘माऊली’ पाठोपाठ ‘मल्हार पर्वा’चाही यू-टर्न आणि स्क्रीनशॉटच्या जाळ्यात ‘प्रायव्हेट लिमिटेड’!

Next Post
राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!

'माऊली' पाठोपाठ 'मल्हार पर्वा'चाही यू-टर्न आणि स्क्रीनशॉटच्या जाळ्यात 'प्रायव्हेट लिमिटेड'!

ताज्या बातम्या

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026

Recent Posts

  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!