• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘माऊली’चा युटर्न, आयफोनचं रहस्य आणि राणा साहेबांची ‘ब्लंडर बँक’!

धाराशिव भाजप 'कुरुक्षेत्र' भाग-६

admin by admin
August 6, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It
‘माऊली’ अर्थात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या एका व्हॉट्सॲप स्टेटसने धाराशिव भाजपमध्ये जो राजकीय वणवा पेटवला, त्याची धग थेट मुंबईतील हायकमांडपर्यंत पोहोचली. निष्ठावंतांनी दिलेले सडेतोड उत्तर, विनोद गपाट यांचा ऐतिहासिक ‘दे दणादण’ आणि वरिष्ठांची वक्रदृष्टी पाहता, हे प्रकरण आता आपल्या चांगलेच अंगलट आल्याची जाणीव राणा गटाला झाली. मग काय? डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ‘माऊलीं’नी थेट युटर्न घेतला आणि असा काही भन्नाट खुलासा केला, की वाचून लोकांची हसून हसून पुरेवाट झाली!

खुलासा की विनोद? “ती पोस्ट टीमनेच टाकली हो!”

राजकारणात एक अलिखित नियम असतो- ‘खोटं बोल, पण रेटून बोल!’ याच नियमाचे तंतोतंत पालन करत माऊलींनी एक भलीमोठी पोस्ट टाकून सारवासारव केली. त्यांनी म्हटले,
“मी सध्या माझ्या मुलाच्या पदवीदान सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी परदेशात आहे. वेळेतील फरकामुळे माझ्या सोशल मीडिया टीमने माझी पूर्वपरवानगी न घेता, अनवधानाने माझ्या अधिकृत स्टेटसवर तो मजकूर प्रसिद्ध केला. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. पक्ष आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हीच माझी प्राथमिकता राहील.”

‘आयफोन’ परदेशात अन् व्हॉट्सॲप हँडलर धाराशिवमध्ये?

माऊलींचा हा खुलासा वाचून धाराशिवची जनता मात्र डोक्याला हात लावून बसली आहे. जर ही पोस्ट फेसबुक किंवा ट्विटर (X) पेजवर आली असती, तर एकवेळ लोकांनी मान्य केले असते की चला, पीआर टीमची चूक झाली असावी. पण अहो, व्हॉट्सॲप स्टेटस? तेही ‘माऊलीं’च्या स्वतःच्या पर्सनल मोबाईलवरून?
माऊली स्वतः परदेशात दौऱ्यावर असताना त्यांचा पर्सनल ‘आयफोन’ त्यांनी इथे धाराशिवमध्ये कोणत्या पीआर वाल्याच्या हातात दिला होता का? की टीमने थेट परदेशातून त्यांचा व्हॉट्सॲप ऑपरेट केला? थोडक्यात काय, तर ‘आलं अंगावर, की ढकल टीमवर!’ हा जुनाच फॉर्म्युला इथे वापरण्यात आला. यांची सोशल मीडिया टीम दुसऱ्यांवर भुंकते हे सर्वांना माहीत होते, पण तीच टीम आता माऊलींनाच असे गोत्यात आणेल, याचा विचार कुणी केला नव्हता.

नेटिझन्सची फिरकी: “लोकांना येड्यात काढायचं कधी बंद करताय?”

हा बालिश खुलासा समोर येताच सोशल मीडियावर नेटिझन्सनी अक्षरशः पिसे काढली आहेत. एकाने तर अर्चना पाटील यांच्या पोस्टवरवरच थेट निशाणा साधत कमेंट केली:
“अब आयेगा मजा…. पण ते लोकांना येड्यात काढायचं कधी बंद करताय? स्वतःच्या मोबाईलचं स्टेटस दुसरं कोणी कशाला ठेवेल?”
जनतेचा हा थेट सवाल राणा समर्थकांना निरुत्तर करणारा आहे.

सर्व फजितीच्या मुळाशी साहेबांची ‘ब्लंडर बँक’!

आता प्रश्न पडतो की, अशा आत्मघातकी चुका राणा पाटील आणि अर्चना पाटील यांच्याकडून वारंवार का होत आहेत? तर याचे उत्तर त्यांच्या अवतीभवती घुटमळणाऱ्या ‘अष्टप्रधान मंडळात’ दडले आहे.
धाराशिवच्या राजकीय वर्तुळात या सल्लागार मंडळाला लोक प्रेमाने ‘ब्लंडर बँक’ (Blunder Bank) म्हणतात! हीच ती ‘ब्लंडर बँक’ आहे, जी राणा साहेबांना नेहमी चुकीचे सल्ले देते. इकडे तिकडे ‘कानफुंकी’ करणे, निष्ठावंतांबद्दल साहेबांचे कान भरणे आणि स्वतःच्याच नेत्याला खड्ड्यात घालणे, यात या टीमचा हातखंडा आहे. माऊलींचे ते वादग्रस्त स्टेटस आणि त्यानंतर आलेला हा हास्यास्पद खुलासा, हा याच ‘ब्लंडर बँके’चा नवा पराक्रम असल्याची चर्चा आता रंगली आहे.
थोडक्यात, ‘स्टेटस’ तर डिलीट झाले आणि दिलगिरीही व्यक्त झाली, पण निष्ठावंतांच्या मनातील ‘खदखद’ आणि जनतेच्या मनातील ‘संशय’ मात्र डिलीट झालेला नाही. आता या ब्लंडर बँकेच्या सल्ल्याने राणा गट सुनील राणेंच्या बैठकीत कोणता नवा ‘ब्लंडर’ करतो, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे!
‘माऊली’च्या स्टेटसला ऐतिहासिक ‘दे दणादण’ आणि हायकमांडचा राणांना ‘रायगड’चा धक्का!

माऊली’चा व्हॉट्सॲप बाण, मुंबईतली ‘ती’ रहस्यमयी फाईल आणि निष्ठावंतांचे ‘ओपन चॅलेंज’!

राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!
‘पेड’ ट्रोलिंगची फौज आणि दुसऱ्याच्या ‘सातबाऱ्यावर’ मालकीचा डाव!
धाराशिव भाजपचे ‘कुरुक्षेत्र’: कमळाच्या बागेत ‘प्रायव्हेट लिमिटेड’चा राडा!
Previous Post

‘माऊली’च्या स्टेटसला ऐतिहासिक ‘दे दणादण’ आणि हायकमांडचा राणांना ‘रायगड’चा धक्का!

Next Post

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! धाराशिवच्या २२ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात १५ कृषी अधिकारी निलंबित

Next Post
महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! धाराशिवच्या २२ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात १५ कृषी अधिकारी निलंबित

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! धाराशिवच्या २२ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात १५ कृषी अधिकारी निलंबित

ताज्या बातम्या

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026

Recent Posts

  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!