• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवच्या १४ वगळलेल्या महसूल मंडळांसह ४३ मंडळांना पिक कापणी प्रयोगावर विमा द्या

आमदार कैलास पाटील यांची मागणी

admin by admin
August 4, 2026
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव |  खरीप २०२५ मधील पिक विमा भरपाईत तांत्रिक उत्पादनाच्या निकषावरून वगळण्यात आलेल्या धाराशिव जिल्ह्यातील १४ महसूल मंडळांसह ४३ मंडळांतील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पिक कापणी प्रयोगाच्या आधारे विमा भरपाई द्यावी, तसेच यासंदर्भात राज्य तक्रार निवारण समितीची तातडीने सुनावणी आयोजित करावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी राज्याचे प्रधान सचिव तथा राज्य तक्रार निवारण समितीकडे केली आहे.

आमदार पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खरीप २०२५ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील २ लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी ४ लाख ९६ हजार अर्जांद्वारे सुमारे ३ लाख ९६ हजार हेक्टर क्षेत्राचा पिक विमा भरला होता. आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीला केंद्र, राज्य सरकार आणि शेतकऱ्यांच्या हिश्श्यासह १३०.७९ कोटी रुपयांचा विमा हप्ता प्राप्त झाला होता.

मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या १८१ टक्के पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पशुधन वाहून गेले, घरांची पडझड झाली आणि अनेक ठिकाणी जमीन खरवडून गेली. परिस्थितीची पाहणी कृषी विभाग आणि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी करून ८० ते ९० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल दिला होता. त्यानुसार शासनाने एसडीआरएफ आणि एनडीआरएफ अंतर्गत ५२४ कोटी रुपयांची मदत वितरित केली होती.

मात्र नव्या पिक विमा योजनेत नुकसान भरपाईसाठी तांत्रिक उत्पादन आणि पिक कापणी प्रयोग हे निकष लागू करण्यात आले. त्यामध्ये तांत्रिक उत्पादन जास्त दाखवल्याच्या कारणावरून १४ महसूल मंडळांना विमा भरपाईतून वगळण्यात आले, असा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे.

त्यांच्या मते, सॅटेलाइटवर आधारित तांत्रिक उत्पादनाचा अंदाज वस्तुस्थितीशी विसंगत असून ढगाळ वातावरण, लहान शेतजमिनी आणि सूक्ष्म स्वरूपातील नुकसानीमुळे अचूक आकडेवारी मिळालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी मागविलेल्या कृषी विद्यापीठाच्या अहवालातही तांत्रिक उत्पादन कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आमदार पाटील यांनी सांगितले की, पिक कापणी प्रयोगाच्या आधारे भरपाई दिल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी ४० ते ४५ हजार रुपयांप्रमाणे सुमारे १,०६८ कोटी रुपयांची भरपाई मिळू शकते. मात्र तांत्रिक उत्पादनाच्या निकषामुळे जिल्ह्याला केवळ ३४० कोटी रुपये मिळत आहेत.

तसेच, केंद्र शासनाच्या समितीने ९ जुलै २०२६ रोजी विमा कंपनीचे अपील फेटाळून सात दिवसांत भरपाई देण्याचे आदेश दिले होते. तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नसल्याचे त्यांनी नमूद केले.

विशेषतः अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसलेल्या परंडा तालुक्यातील सहा महसूल मंडळांना विमा भरपाईतून वगळणे अन्यायकारक असल्याचा आरोपही त्यांनी केला.

यासंदर्भात मुख्यमंत्री यांनाही मंडळनिहाय आकडेवारीसह पत्र देण्यात आले असून, १४ वगळलेल्या महसूल मंडळांसह ४३ मंडळांच्या शेतकऱ्यांना पिक कापणी प्रयोगाच्या आधारे विमा भरपाई मिळावी आणि राज्य तक्रार निवारण समितीने तातडीने सुनावणी घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

Previous Post

तेरखेड्यात महायुतीतील दोन गटांत तुफान राडा; 45 जणांवर गुन्हा, गावात पोलिसांचा बंदोबस्त

Next Post

धाराशिवचे विदारक वास्तव: साहेब ‘फेसबुक लाईव्ह’वर, मॅडम ‘व्हिजन २०३०’मध्ये आणि विद्यार्थी शिक्षकांसाठी रस्त्यावर!

Next Post
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिवचे विदारक वास्तव: साहेब 'फेसबुक लाईव्ह'वर, मॅडम 'व्हिजन २०३०'मध्ये आणि विद्यार्थी शिक्षकांसाठी रस्त्यावर!

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिवचे विदारक वास्तव: साहेब ‘फेसबुक लाईव्ह’वर, मॅडम ‘व्हिजन २०३०’मध्ये आणि विद्यार्थी शिक्षकांसाठी रस्त्यावर!

August 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

धाराशिवच्या १४ वगळलेल्या महसूल मंडळांसह ४३ मंडळांना पिक कापणी प्रयोगावर विमा द्या

August 4, 2026
तेरखेड्यात महायुतीतील दोन गटांत तुफान राडा; 45 जणांवर गुन्हा, गावात पोलिसांचा बंदोबस्त

तेरखेड्यात महायुतीतील दोन गटांत तुफान राडा; 45 जणांवर गुन्हा, गावात पोलिसांचा बंदोबस्त

August 4, 2026
उमरगा उपजिल्हा रुग्णालय प्रकरण: विनयभंगाच्या आरोपावरून आयएमए आक्रमक

उमरगा उपजिल्हा रुग्णालय प्रकरण: विनयभंगाच्या आरोपावरून आयएमए आक्रमक

August 4, 2026
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

धाराशिवमध्ये दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर बॉम्बस्फोटाचा बनाव!

August 4, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!