• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘अहवालावर सह्या का केल्या?’ म्हणत तरुणाला जातीवाचक शिवीगाळ व बेदम मारहाण; एकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

admin by admin
May 19, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब : ‘माझ्या विरुद्धच्या अहवालावर सह्या केल्याने मी जेलमध्ये गेलो होतो,’ याचा राग मनात धरून एका तरुणाला व त्याच्या मित्राला जातीवाचक शिवीगाळ करत काठीने मारहाण केल्याची घटना कळंब शहरात उघडकीस आली आहे. या मारहाणीत तरुण जखमी झाला असून, याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकुश अरुण लोकरे (वय ३४, रा. बाबानगर, कळंब, जि. धाराशिव) असे मारहाण झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आकाश भागवत चोंदे (रा. चोंदेगल्ली, कळंब) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १७) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कळंब येथील केज रोडवरील मुळे बॅटरी दुकानासमोर ही घटना घडली. फिर्यादी अंकुश लोकरे आणि त्यांचा मित्र राहुल बिभीषण वाघमारे हे तेथे उभे होते. त्यावेळी आरोपी आकाश चोंदे तिथे आला. त्याने फिर्यादीस ‘तू व तुझा मित्र अशा दोघांनी मिळून माझ्या अहवालावर सह्या केल्यामुळे मी जेलमध्ये गेलो होतो,’ असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली.

याच रागातून आरोपीने अंकुश लोकरे यांना भररस्त्यात जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण करत त्यांना जखमी केले. एवढ्यावरच न थांबता त्याने जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.

या धक्कादायक घटनेनंतर जखमी फिर्यादी अंकुश लोकरे यांनी सोमवारी (दि. १८) कळंब पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या या प्रथम खबरेवरून पोलिसांनी आरोपी आकाश चोंदे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३) सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा (ॲट्रॉसिटी) कलम ३(१)(आर), ३(१)(एस) आणि ३(२)(व्हीए) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.

Previous Post

‘माझे नाव का सांगितले?’ विचारल्याच्या रागातून तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; रोहकल येथील चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

पवनचक्की प्रकल्पात तब्बल १७ कोटींचे नुकसान; जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना, पोलिसांत गुन्हे दाखल

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

पवनचक्की प्रकल्पात तब्बल १७ कोटींचे नुकसान; जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना, पोलिसांत गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीच्या दोन घटना; दोन महिला ताब्यात

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात दोन विवाहित पुरुषांचे अपहरण; लोहारा आणि परंडा पोलिसांत गुन्हे दाखल

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशी : टेम्पोतील कोऱ्या चेकवर खोटी सही करून लावला ८ लाखांचा चुना

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूर : बेकायदेशीर ताडीत (शिंदी) गुंगीचे औषध मिसळल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

October 16, 2026

Recent Posts

  • तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीच्या दोन घटना; दोन महिला ताब्यात
  • धाराशिव जिल्ह्यात दोन विवाहित पुरुषांचे अपहरण; लोहारा आणि परंडा पोलिसांत गुन्हे दाखल
  • वाशी : टेम्पोतील कोऱ्या चेकवर खोटी सही करून लावला ८ लाखांचा चुना
  • अणदूर : बेकायदेशीर ताडीत (शिंदी) गुंगीचे औषध मिसळल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!