लोहारा – येथील स्वामी रामानंद तिर्थ शाळेजवळ २३ जानेवारी रोजी रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान गणेश इंद्रजित नरगाळे यांनी नंदु लक्ष्मण सोमवंशी (वय ३२, रा. हिप्परगा रवा) यांना उसन्या पैशांच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत सोमवंशी यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.
सोमवंशी यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून लोहारा पोलीस ठाण्यात नरगाळे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ११८(२), ११७(२), (५), ११५(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशीत मोटारसायकलच्या बांगडी पाईपवरून मारहाण, गुन्हा दाखल
वाशी – निपानी येथे मोटारसायकलच्या बांगडी पाईपवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालाजी दत्तात्रय गिरी (वय ४२, रा. निपानी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २४ जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजता आण्णासाहेब श्रीरंग डोके, संघर्ष आण्णासाहेब डोके, विश्वजीत आण्णासाहेब डोके आणि स्मिता आण्णासाहेब डोके (सर्व रा. निपानी) यांनी त्यांना मोटारसायकलच्या बांगडी पाईपवरून शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर आरोपींनी दगड आणि लोखंडी रॉडनेही गिरी यांना मारहाण केली. या मारहाणीत गिरी जखमी झाले असून आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या घटनेनंतर बालाजी गिरी यांनी २६ जानेवारी रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ३३२(सी), ११५, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने शिवीगाळ व मारहाण
मुरुम – काळलिंबाळा तांडा येथील सखाराम गणा राठोड याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका महिलेला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना २६ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया विजयकुमार राठोड (वय ३५) आणि त्यांचे पती हे शेतात जात असताना आरोपी सखाराम राठोड याने त्यांना अडवले आणि दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे नाकारल्यावर त्याने छाया राठोड यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्यावर दगडफेक देखील केली. छाया यांचे पती भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही आरोपीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर छाया राठोड यांनी मुरुम पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सखाराम राठोड विरुद्ध भा.न्या.सं. कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाणी देण्यावरून वाद; वृद्ध महिलेला मारहाण
नळदुर्ग –अलियाबाद तांडा येथे पाणी देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी हिरा चव्हाण आणि पार्वती हिरा चव्हाण यांनी छमाबाई हरिशचंद्र चव्हाण (वय ६०) यांना पाणी देण्यावरून शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड आणि लाकडाने मारहाण करून जखमी केले. इतकेच नव्हे तर त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर छमाबाई चव्हाण यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवाजी हिरा चव्हाण आणि पार्वती हिरा चव्हाण यांच्याविरुद्ध भा.न्या.सं.कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.