• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, October 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

प्रेमविवाह प्रकरणाला न्यायालयीन वळण; पत्नीच्या सुरक्षिततेसाठी पतीची उच्च न्यायालयात धाव

admin by admin
May 24, 2026
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  : प्रेमविवाह केलेल्या पत्नीच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत एका युवकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, पत्नीच्या जीवितास धोका असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

याचिकेनुसार, संबंधित युवक व युवती यांनी ४ मे २०२६ रोजी आळंदी येथे प्रेमविवाह केला. विवाहानंतर १० मे रोजी दोघेही संरक्षणासाठी येरमाळा पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, पोलिसांनी त्यांचे म्हणणे नोंदवून घेतले नाही तसेच संरक्षणही दिले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्नीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने पतीने अॅड. गणेश ज्योतीराम कोरे व अॅड. ओमप्रकाश वाघमारे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.

याचिकेत पुढे नमूद करण्यात आले आहे की, पोलीस ठाण्याबाहेर युवतीच्या नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती. त्यानंतर लातूर पोलिसांनी युवतीला जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या युवती नातेवाईकांच्या ताब्यात असून तिच्या जीवाला धोका असल्याची भीती याचिकाकर्त्याने व्यक्त केली आहे.

या प्रकरणी क्रिमिनल रिट पिटिशन क्रमांक ६४८/२०२६ दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती वैशाली पाटील-जाधव यांनी १५ मे रोजी प्राथमिक सुनावणी घेत नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर २२ मे रोजी सुट्टीकालीन न्यायालयात न्यायमूर्ती सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षाने युवतीचा जबाब न्यायालयात सादर केला. संबंधित युवतीने स्वतःच्या इच्छेने विवाह केल्याचे जबाबात नमूद असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. मात्र, नोटीस मिळाल्यानंतरही युवतीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले नसल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांच्या वतीने उपस्थित करण्यात आला.

दरम्यान, युवती सध्या स्वतःच्या इच्छेने नातेवाईकांसोबत राहत असल्याचे प्रतिवादींच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. मात्र, युवतीला घरात डांबून ठेवण्यात आल्याची भीती याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. गणेश ज्योतीराम कोरे यांनी व्यक्त केली.

न्यायालयाने पुढील सुनावणी २९ मे २०२६ रोजी ठेवली असून, तोपर्यंत युवतीच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचेल असे कोणतेही कृत्य करणार नाही, अशी हमी प्रतिवादींकडून नोंदवून घेतली.

प्रदीप बिभीषण दिवाने यांनी दाखल केलेल्या फौजदारी रिट याचिकेवर (क्रमांक ६४८/२०२६) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली. या प्रकरणात याचिकाकर्त्याच्या पत्नीला प्रतिवाद्यांनी घरात डांबून ठेवले असल्याची भीती पतीच्या वकिलांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पत्नीच्या जीविताला किंवा सुरक्षेला कोणताही धोका पोहोचेल असे कोणतेही पाऊल उचलणार नाही, अशी हमी प्रतिवादी क्रमांक ५ आणि ६ यांनी न्यायालयाला दिली आहे.

Previous Post

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करा!

Next Post

उच्च न्यायालयाचा दिलासा : परंडा बाजार समितीतील दुकाने तोडण्यास स्थगिती

Next Post
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

उच्च न्यायालयाचा दिलासा : परंडा बाजार समितीतील दुकाने तोडण्यास स्थगिती

ताज्या बातम्या

साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!

‘किमान मला तरी विचारा’ म्हणणाऱ्या राणा पाटलांना थेट सवाल: हातच्या कंकणाला आरसा कशाला?

October 15, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मध्यरात्री इनोव्हा कारमधून गावठी कट्टा व काडतूस जप्त; तुळजापूर पोलिसांची धडक कारवाई

October 15, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

नळदुर्ग : वसंत नगरातील श्री जगदंबा देवीच्या मंदिराचे कुलूप तोडून गाभाऱ्यातून ७५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

October 15, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : मौलाना आझाद चौकात टोळक्याचा राडा; मित्राच्या भावाला धक्काबुक्कीचा जाब विचारल्याने तरुणावर काठ्या-दगडांनी हल्ला

October 15, 2026
 तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!

 तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!

October 15, 2026

Recent Posts

  • ‘किमान मला तरी विचारा’ म्हणणाऱ्या राणा पाटलांना थेट सवाल: हातच्या कंकणाला आरसा कशाला?
  • तुळजापूर : मध्यरात्री इनोव्हा कारमधून गावठी कट्टा व काडतूस जप्त; तुळजापूर पोलिसांची धडक कारवाई
  • नळदुर्ग : वसंत नगरातील श्री जगदंबा देवीच्या मंदिराचे कुलूप तोडून गाभाऱ्यातून ७५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
  • उमरगा : मौलाना आझाद चौकात टोळक्याचा राडा; मित्राच्या भावाला धक्काबुक्कीचा जाब विचारल्याने तरुणावर काठ्या-दगडांनी हल्ला
  •  तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!