उमरगा: तालुक्यातील शिवाजी नगर तांडा दाळींब येथे झालेल्या मोटारसायकल अपघातात एका 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवि विठ्ठल चव्हाण (वय 32) आणि सचिन धोंडीबा पवार (रा. शिवाजी नगर तांडा दाळींब) हे दोघे शिवाजी नगर तांडा दाळींब येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 65 वरून मोटरसायकल (क्र. के.ए. 56 एल 3365) ने जात होते. यावेळी सचिन पवार याने मोटारसायकल हायगयी आणि निष्काळजीपणे चालवल्याने मोटरसायकल स्लिप झाली. या अपघातात रवि चव्हाण हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी मयत रवि चव्हाण यांचे बंधू बळीराम चव्हाण (वय 37) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुम पोलीस ठाण्यात सचिन पवार याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 281, 106, 125(ए), 125(बी) सह 184 आणि मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.