शिराढोण: शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या रस्त्या अपघातात एका मोटरसायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघात करून जखमीस मदत न करता फरार झालेल्या दुसऱ्या मोटरसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सम्राट अशोक नगर, डिकसळ येथील रहिवासी संजय प्रभाकर साळुंके (वय 46) हे त्यांच्या मोटरसायकल क्रमांक एमएच 25 एएन 1083 वरून जात असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या मोटरसायकल क्रमांक एमएच 25 एटी 1661 ने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात संजय साळुंके हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात करणारा मोटरसायकल चालक जखमी संजय साळुंके यांना मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी मयत संजय साळुंके यांच्या पत्नी अंजली साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 125(बी), 106, सह 134 (अ),(ब),184 मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फरार मोटरसायकल चालकाचा शोध सुरू केला आहे.