मुरूम: महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही धाराशिव जिल्ह्यात गुटख्याची राजरोस विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव धाराशिव लाइव्हने उघड केले आहे. कर्नाटक राज्यातून येणारा गुटखा मुरूम पोलीस स्टेशन हद्दीतून जिल्ह्यात प्रवेश करतो आणि संपूर्ण धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्ह्यात पोहोचवला जातो.
धाराशिव लाइव्हने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये, रात्रीच्या वेळी एक गुटखा तस्कर मोटारसायकलवरून गुटख्याने भरलेल्या गोण्या घेऊन जाताना दिसत आहे. पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांनी तो गुटखा पकडल्यानंतर, गुटखा तस्कर वसूलदार रणखांब यांना फोन करतो आणि राठोड यांना बोलण्यास सांगतो. रणखांब फोनवरून “आपला माणूस आहे, सोडून द्या” असे आदेश देतात. राठोड साहेबांना ( सपोनि -संदीप दहिफळे ) फोन करू का असे विचारताच, रणखांब हे साहेब माझ्यासोबतच असल्याचे सांगतात आणि गुटखा सोडून दिला जातो.
आणखी एका व्हिडिओमध्ये एक मटका किंग मला स्वतःचा मटका धंदा सुरु करायचे सांगतो. त्यावेळी वसूलदार रणखांब दरमहा १ लाख ४० हजार हप्ता सुरु करा. साहेबांशी (सपोनि -संदीप दहिफळे) बोलणे झाले आहे. तुमची मिटिंग साहेबांशी करून देतो असे म्हटले आहे.
धाराशिव लाइव्हच्या बातमीनंतर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे स्वतःला वाचण्यासाठी वसूलदार रणखांब आणि पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांचा बळी देत आहेत. तसेच ज्यांनी व्हिडिओ केला त्यांना दमदाटी सुरू आहे.
सपोनि संदीप दहिफळे हे परळी वैजनाथचे वाल्मिक कराड यांचे नातेसंबंध असल्याचे सांगून आजवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर दबाव आणत होते , अशी चर्चा सुरु आहे.
गुटखा तस्करीचा अजब कारभार:
- विमल, गोवा, हिरा, हिना, आरएमडी, रजनीगंधा, बादशहा नावाचा गुटखा पानटपरी, हॉटेल्स आणि किराणा दुकानांमध्ये खुलेआम विकला जात आहे.
- गुटखा वाहतूक करणाऱ्या प्रत्येक गाडी मालकाकडून किमान २० हजार रुपये हप्ता म्हणून वसूल केला जात आहे.
- कर्नाटक राज्यातून हा गुटखा राजू कलशेट्टी नावाचा गुटखा तस्कर पाठवतो.
- मुरूमचा वसूलदार रणखांब जोपर्यंत ग्रीन सिग्नल देत नाही तोपर्यंत गुटखा पाठवला जात नाही.
- गुटख्यामध्ये मुरूमच्या वसूलदाराची भागीदारी असल्याचे समोर आले आहे.
- कर्नाटक राज्यातून हा गुटखा पिकअप, कार, आयशर टेम्पो, इन्व्हॉव्हा आदी वाहनातून पाठवला जातो.
- प्रत्येक पोलीस स्टेशनला दर महिन्याला ठराविक हप्ता दिला जातो.
- हा रणखांब मुरुमचा साहेबाना आणि पोलीस मुख्यालयात बसलेल्या एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याला धरून आहे.
- मुरुमच्या एका पोलिसांने पकडलेला गुटखा जप्त करण्याऐवजी तो एका व्यापाऱ्याला विक्री करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.