• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सिंदफळमध्ये शेतकऱ्याचा निर्घृण खून; स्टीलच्या रॉडने चेहरा ठेचला

admin by admin
March 6, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
सिंदफळमध्ये शेतकऱ्याचा निर्घृण खून; स्टीलच्या रॉडने चेहरा ठेचला
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ शिवारात शेतातील विहिरीला मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा स्टीलच्या रॉडने निर्घृण खून करण्यात आला. ही घटना ५ मार्च रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

रक्ताच्या थारोळ्यात सापडला शेतकरी

मयत सत्तार यासीम इनामदार (वय ५७) हे पाच मार्च रोजी सायंकाळी आपल्या शेतातील विहिरीतील मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. बराच वेळ होऊनही परत न आल्याने त्यांचा मुलगा सोहेल त्यांना पाहण्यासाठी शेतात गेला. तिथे त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून तो हादरला. त्याच्या डोक्यावर स्टीलच्या रॉडने जबर मारहाण करण्यात आली होती.

कुटुंबीयांनी त्यांना तातडीने तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनास्थळी मद्याच्या बाटल्या आणि सिगारेट

घटनास्थळी पोलिसांना दारूच्या बाटल्या, सिगारेटचे पाकिटे आणि कुरकुरेचे पॉकेट आढळून आले. तसेच आंब्याच्या झाडाखाली कैऱ्या आढळून आल्या. त्यामुळे या घटनेमागे नेमके कोणते कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

गावात दहशतीचे वातावरण; मुख्य आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार

तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. वसीम गफुर इनामदार (वय ३५, रा. सिंदफळ) यांच्या फिर्यादीवरून गणेश घाटशिळे आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 103(1), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश घाटशिळे हा यापूर्वीही अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेला असून, काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्याच्याकडून गांजा जप्त केला होता. तो सध्या जामिनावर बाहेर होता. आता त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेमागील नेमके कारण काय आहे, याचा तपास पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

News Update

सिंदफळ शेतकरी खून प्रकरण: २४ तासांत दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Previous Post

शेतकऱ्यांना फसवू नका, तळतळाट ओढवून घेऊ नका…

Next Post

जालना जिल्ह्यातील अमानुष अत्याचार प्रकरणाचा निषेध

Next Post
जालना जिल्ह्यातील अमानुष अत्याचार प्रकरणाचा निषेध

जालना जिल्ह्यातील अमानुष अत्याचार प्रकरणाचा निषेध

ताज्या बातम्या

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026
भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

September 19, 2026
तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

September 19, 2026

Recent Posts

  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
  • भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले
  • तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!