• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात पोलिसांची धडक कारवाई, परंड्यात मात्र ‘हाजी मस्तान’ निर्धास्त!

admin by admin
February 27, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात ड्रग्जचा कहर – प्रशासनाची जबाबदारी कुठे?
0
SHARES
1.4k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर आणि तामलवाडी पोलिसांनी ड्रग्जच्या व्यसनाला रोखण्यासाठी आक्रमक मोहीम हाती घेतली असून, आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, एका माजी नगराध्यक्षालाही ताब्यात घेतल्याची चर्चा रंगली असली तरी, पोलिसांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

तुळजापुरात पोलिसांचा आक्रमक पवित्रा असताना, परंड्यात मात्र संपूर्ण शांतता आहे. येथे एमडी ड्रग्जचा खुलेआम व्यवसाय सुरू असून, हे शहर तुळजापूरच्या तुलनेत दहा पट अधिक प्रमाणात या काळ्या धंद्याचे अड्डे झाले आहेत.

हॉटेलमध्ये कपबश्या धुणाऱ्या ‘हाजी मस्तान’ची परंड्यात बादशाही!

एकेकाळी हॉटेलमध्ये कपबश्या धुणारा एक तरुण आता ‘हाजी मस्तान’ बनण्याची स्वप्नं पाहतोय! ड्रग्जचा संपूर्ण धंदा याच्या इशाऱ्यावर चालतो, आणि जवळपास पाच हजार तरुण त्याच्या विळख्यात सापडले आहेत.

सर्वात धक्कादायक म्हणजे, एका बड्या राजकीय नेत्याच्या ‘संरक्षणा’मुळे हा मुख्य सूत्रधार आजवर पोलिसांच्या तावडीत सापडला नाही. मात्र, या नेत्याचे सध्या राजकीय वजन कमी झाल्याने, परंड्यातील हा ड्रग्ज पेडलर फरार झाला आहे.

परंडा पोलिसांचा संशयास्पद मौन!

तुळजापूर आणि तामलवाडी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असताना, परंडा पोलिस मात्र गप्प का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची गरज आहे. परंड्यात ड्रग्जच्या आहारी गेलेल्या पाच हजार तरुणांचे भवितव्य अंधारात जात असताना, पोलिसांनी डोळेझाक करणे गंभीर आहे.

आता पाहावे लागेल की, परंड्यातील हा ‘हाजी मस्तान’ लवकर गजाआड होतो की, राजकीय वरदहस्तामुळे आणखी काही काळ सुटतो?

Previous Post

ढोकीत नावी ॲपचा ‘नावडता’ घोटाळा! रिचार्जच्या नावाने कर्जाचा फास, तरुणांचे बँक खाते ‘मायनस’!

Next Post

तुळजाभवानीच्या दरबारात ‘तुघलकी’ तारणहक्क!

Next Post
तुळजाभवानी मंदिराचा कायापालट होणार, दोन हजार कोटींचा आराखडा सादर

तुळजाभवानीच्या दरबारात 'तुघलकी' तारणहक्क!

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात घरात कोयते बाळगणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल

June 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

नळदुर्ग परिसरात सोलर कंपनीची ८० हजारांची केबल लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

June 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

अचलेर तांड्यावर जुन्या वादातून हाणामारी;  सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 13, 2026
गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद!

गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद!

June 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात खळबळजनक! वयोवृद्ध शेतकऱ्याकडे ५ लाखांची खंडणी; ‘ॲट्रॉसिटी’ अन् छेडछाडीच्या खोट्या केसची धमकी

June 12, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group