तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील बारुळ येथे पवनचक्की ठेकेदारांच्या गुंडांनी शेतकरी सचिन ठोंबरे यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ठोंबरे यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी एक महिना उलटूनही कोणतीही कारवाई केली नाही.
त्यामुळे ठोंबरे यांनी आपल्या कुटुंबासह तुळजापुरात उपोषण सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला. मात्र, मुख्य आरोपीला अभय दिले आहे.
गुन्हा दाखल करण्यास कुचराई केल्याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग फुलसुंदर यांना निलंबित करण्यात आले आहे. परंतु, या गुंडांना पाठीशी घालणारे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांची तात्काळ उचलबांगडी करावी, अशी मागणी होत आहे.
या प्रकरणी ‘धाराशिव लाइव्ह’ने सातत्याने आवाज उठवला होता.
- पवनचक्की ठेकेदारांच्या गुंडांनी शेतकऱ्याला मारहाण केली.
- पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्याला उपोषण करावे लागले.
- आठ जणांवर गुन्हा दाखल; मुख्य आरोपीना अभय
- गुन्हा दाखल करण्यास कुचराई केल्याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल निलंबित.
- पोलीस निरीक्षकांवर कारवाईची मागणी.