धाराशिव – धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या बोगस नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्राच्या प्रकरणाचा पर्दाफाश माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी गुरुवारी (४ ऑक्टोबर) रोजी केला होता. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठा गदारोळ झाला आहे. सात दिवसांनंतर महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचा निषेध केला असून, डॉ. ओम्बासे यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, या निवेदनात दोषारोप करणाऱ्यांचे नाव उघडपणे देण्यात आलेले नाही.
प्रकरणात दिसून येते की, महसूल विभागाच्या निवेदनात २२ जानेवारी २०१३ रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ दिला आहे, मात्र त्यानंतर २५ मार्च २०१३ रोजी शासन निर्णयात झालेल्या सुधारणा लपवून ठेवण्यात आलेल्या आहेत. यामुळे निवेदनात अर्धवट माहितीचा आधार घेत डॉ. ओम्बासे यांच्या स्वच्छ प्रतिमेचा दावा करण्यात आल्याचे सुभेदार यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी डॉ. ओम्बासे यांना खुले आव्हान दिले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, “डॉ. ओम्बासे यांनी त्यांच्या वडिलांची निवृत्तीची तारीख आणि त्यांची जन्मतारीख सार्वजनिक करावी. तसेच, त्यांनी २०१४ साली यूपीएससीचा अर्ज भरला होता, त्या अर्जासोबत जोडलेले नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र व त्यावेळचे उत्पन्नाचे तपशील जाहीर करावेत.” तसेच २०११-१२, २०१२-१३ आणि २०१३-१४ या आर्थिक वर्षांतील उत्पन्नाची संपूर्ण माहिती जाहीर करावी. .
डॉ. सचिन ओम्बासे यांच्या बोगस नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र प्रकरणावरून आता वाद चांगलाच पेटला आहे. लोकसेवा आयोगाने या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. सध्या जिल्ह्यात या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, अनेकांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.
धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे पाय आणखी खोलात
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे खुलासा करून स्वतः फसले !
धाराशिवचे ‘नविन क्रीमी लेयर पत्रकार’ आणि जिल्हाधिकाऱ्यांची तंगडी !
“कलेक्टर साहेबांचे बोगस प्रमाणपत्र: सरकारी हेराफेरी की स्मार्टनेस?”
धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांवर संशयाची सुई: प्रामाणिकतेचा प्रश्न !
धाराशिवमध्ये साहेबांच्या ब्लॅकमेल प्रकरणात पत्रकारांचा धुमाकूळ!
“कलेक्टर साहेबांना ब्लँकमेल करणारे दोन ‘धाराशिवी’ पत्रकार कोण ?